बहुचर्चित असणाऱ्या पॉर्न फिल्म बनविणारी टोळी यांचा जामीन मंजूर


मावळ मराठा न्युज:- पाटण,मावळ, पाटण गावाच्या हद्दीमध्ये बंगल्यात पॉर्न फिल्म (अश्लिल चित्रपट) बनविणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पाच महिलांसह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. २९) पाटण गावाच्या हद्दीतील आर्णव व्हिला या बंगल्यात अश्लिल व्हिडीयो तयार करण्यात येत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना अश्लिल चित्रफीत तयार करीत असताना काहीजण मिळून आले. पोलिसांनी ५ महिला आणि १० पुरुष, बंगला भाड्याने देणाऱ्यांसह इतर ३ जण असे एकूण १८ जणांना ताब्यात घेतले. चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले दोन कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे. विष्णु मुन्नासाहब साओ (वय ३०, रा. कोलकत्ता), समीर मेहताब आलम (वय २६), जावेद हबीबुल्ला खान (वय ३५, दोघेही रा.उत्तरप्रदेश), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय २९, रा. चंद्रपुर), अनुप मिथीलेश चौबे (वय २९, रा. मुंबई), मनीष हिरामण चौधरी (वय २०), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१, दोघेही रा. हरियाणा), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८, रा. ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९, गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१, रा. डेहराडुन), यांना ताब्यात घेतले. सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२) आकेश गौतम शिंदे (वय ३२), सनी विलास शेडगे नि (वय ३५, सर्व रा.मळवली) यांनी ओळखपत्रे न घेता बंगला भाड्याने दिल्याने अटक केली होती. अशा बहु चर्चेत असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामी मुख्य आरोपी विष्णू शॉप व इतर नऊ आरोपी यांच्या वतीने मे. दिवाणी व फौजदारी न्यायालय वडगाव मावळ यांच्याकडे जामिनाचा अर्ज ॲड.अनिकेत जांभुळकर व ॲड.हर्षद राजेंद्र देशमुख यांच्या वतीने ठेवण्यात आला. सदर जामिनाचा अर्ज मे. न्यायालयाने मंजूर केलेला असून आरोप यांना जामीनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे. सदर खटल्यातील मुख्य आरोपी क्रमांक एक ते दहा यांच्यावतीने काम ॲड. अनिकेत जांभुळकर व ॲड. हर्षद राजेंद्र देशमुख यांनी पाहिले




