गुणवत्ता संवर्धन अभियान कार्यक्रमांतर्गत मुळशी तालुक्यातून संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका मुळशी शाळेचा तृतीय क्रमांक

मावळ मराठा न्युज -पुणे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता संवर्धन अभियान कार्यक्रमांतर्गत मुळशी तालुक्यातून संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका मुळशी शाळेचा तालुकास्तर ५०० पर्यंत विद्यार्थी संख्या गटात तृतीय क्रमांक आलेला आहे. डॉ.श्री भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे जिल्हा परिषद पुणे,मा.श्री नंदकुमार सागर अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ,मा. श्री प्रसादजी गायकवाड सचिव पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, मा.श्रीमती महेंद्रकर मॅडम उपशिक्षणाधिकारी,मा. श्री निलेश दानापुणे उपशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सर्व तालुका संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी गणेश कला क्रीडा रंग मंच स्वारगेट पुणे येथे सन्मानित करण्यात आले .संपर्क संस्थेच्या वतीने सौ.नवनिता चटर्जी-चीप प्रोग्रॅम ॲडव्हायझर मा.श्री.सतीश माळी प्रोग्राम मॅनेजर दत्तात्रय चाळक मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माने श्री अमितकुमार बॅनर्जी संस्थापक सचिव यांचे मार्गदर्शन व सर्वांनी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाचे यश आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page