लिफ्टिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या कुमारी तपस्या अशोक मतेला घवघवीत यश

मावळ मराठा न्युज -कर्नाटका पावर लिफ्टिंग असोसिएशन आणि पावर लिफ्टिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दावणगेरे, कर्नाटका येथे २२ जून ते ३० जून दरम्यान सुरू असलेल्या सब ज्युनिअर,ज्युनियर आणि वरिष्ठ पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय (नॅशनल)स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेस च्या कुमारी तपस्या अशोक मते हिने सहभाग नोंदवत सब ज्युनियर ५२ किलो वजनी गटात ३२२ .५ इतके वजन उचलत तीन रौप्य पदके जिंकली. आणि तुर्की आणि रूमानिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण केली. त्याबद्दल शिवदुर्ग मित्र लोणावळा परिवाराकडून तपस्याचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page