गवळीवाडा लोणावळा छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक ६ येथे शालापूर्व तयारी मेळावा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,शनिवार,दिनांक २०/४/२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक ६ गवळीवाडा येथे शालापूर्व तयारी मेळावा अति उत्साहात पार पडला. नवीन त्यांचे प्रवेश घेत असताना त्यांना अतिशय आनंदमय वातावरण निर्माण केले, ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्यात आला विद्यार्थ्यांना फेटे बांधून शाळेचे पहिले पाऊल हळदी कुंकवाने घेण्यात आले. सरस्वती पूजन करून करताना विविध कौशल्य आत्मसात आहेत, याचे सात स्टॉल मांडून त्यांची तयारी कितपत आहे हे पाहण्यात आले, शारीरिक विकास, भावनिक विकास, भाषिक विकास , सामाजिक विकास, बौद्धिक विकास असे विकासाचे टप्पे यांची विविध खेळाच्या माध्यमातून व आनंदमय वातावरणात विकास झाला आहे हे पाहण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी शिक्षिका तसेच सर्व पालक विद्यार्थी असंख्य उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page