कैवल्यधामचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट





मावळ मराठा न्यूज – मुंबई,लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी नुकतीच कैवल्यधाम सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. नितीन करीर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना कैवल्यधाम कॉफी टेबलबुक देऊन सन्मानित केले.श्री सुबोध तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम संस्थेस भेटीसाठी आमंत्रित केले आणि त्यांचे हे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी खुशीने स्वीकारले आहे. लवकरच आपण कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा आणि अखंड शंभर वर्ष संस्था करीत असलेल्या कार्य खरंच कौतुकास्पद असल्याचे फडणवीस यांनी भेटीवेळी सांगितले.




