मंदिर व शक्ती स्थळे आपली संस्कृतीची प्रतिके, हरिपाठा तून संस्कार घडतात – हभप सोमनाथ महाराज सावंत

मावळ मराठा न्यूज :-मंदिर व शक्ती स्थळे आपली संस्कृतीची प्रतिके – ह भ प सोमनाथ महाराज सावंतशिवशंकर मंदिराचा वर्धापन दिन उत्साहातकार्ला- आपल्या मुलांना संस्कारमय घडवा तसेच हरिपाठातून घराघरात संस्कार घडत असतात तसेच आपली मंदिर ही आपल्या संस्कृतीचे प्रतिक असून आपल्या वाणीने आपण जगाला जिंकू शकते असे मत हभप सोमनाथ महाराज सावंत यांनी प्रवचनरुपी सेवा प्रदान करताना कार्ला येथे व्यक्त केले.कार्ला येथील शिवशंकर मंदिराचा १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७ वाजता गणेश हुलावळे यांंच्याहस्ते महाअभिषेक तरसायंकाळी ६ ते ७ ह भ प सोमनाथ महाराज सावंत यांची प्रवचन सेवा झाली. श्री शिवशंकर तरुण मंडळ व कार्ला ग्रांमस्थ, सतीश मोरे , प्रविण हुलावळे , विशाल जमदाडे , बाबाजी सोंडेकर,नंदु खानविलकर,यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.रात्री विठ्ठल रुख्मीणी भजनी मंडळ कार्ला यांनी हरीजागर केला.कार्यक्रमाचे संयोजन शिवशंकर तरुण मंडळ व कार्ला ग्रामस्थ यांंच्या वतिने करण्यात आले होते.




