द फर्न हॉटेल आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ४१ रक्त बाटल्यांचे संकलन




मावळ मराठा न्युज:- लोणावळा द फर्न हॉटेल आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या संयुक्त विद्यमाने मेगा ब्लड डोनेशन कॅम्प चे आयोजन द फर्न हॉटेल येथे पार पडले त्यात ४१ रक्त बाटलीचे संकलन करण्यात आले .प्रत्येक रक्तदात्यास पाच लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात आला.यावेळी द फर्न हॉटेलचे जनरल मॅनेजर रमेश कुमार गुप्ता, एचआर मनोरमा मेहरा तसेच इतर स्टाफ व आधार ब्लड बँकेची पूर्ण टीम लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा चे अध्यक्ष ला, ऍड प्रफुल्ल बी लुंकड ,ऍड डॉ संगीता लुंकड, सचिव विरल गाला, डॉ दिलीप सुराणा, डॉ .पोपट ओसवाल ,जुबेर शमशी, मनोज लुंकड , देवल पारेख, मंगेश कदम,कांता ओसवाल,दिपाली गाला,अश्विनी कदम आदी उपस्थित होते.




