मावळचा युवा मल्ल केतन घारे याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

मावळ मराठा न्युज -लोणावळा, मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथु घारे याने नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ७९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. तर या स्पर्धेत सलग तीन पदके पटकाविण्याची किमया केली. यामध्ये दोन रौप्य व एका कांस्यपदकाचा असुन, युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तर तीन वेळा अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला होता.मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथु घारे याने नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ७९ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. केतन याने आपल्या वजनी गटात प्रतिस्पर्धकांवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सोलापूरच्या शुभम मगर याने अटीतटीच्या लढतीत केतनचा ८-६ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर केतनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केतन याने आतापर्यंत चार राज्य कुस्ती स्पर्धेत चार पदकांची कमाई केली. यामध्ये दोन रौप्य व दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. कोथरूड, पुणे येथे २०२३ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६५ किलो गादी विभागात रौप्य पदक, धाराशिव येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत ६५ किलो गादी विभागात कांस्यपदक पटकावले असून, २०१९ साली आळंदी येथे झाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. तसेच अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी दोनवेळा ६१ किलो तर एकदा ६५ किलो वजनी गटात पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. केतन घारे याचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, ऑलिंपिक कुस्तीगीर, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चॅम्पियन पै. खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, उपाध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. सचिन घोटकुले, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, पै.मनोज येवले, राष्ट्रीय कुस्तीगीर व कार्याध्यक्ष पै. नागेश राक्षे, राष्ट्रीय कुस्तीगीर, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन ॲड पप्पू कालेकर, पै. निवृत्ती काकडे, पै. तानाजी कारके, पै. विष्णू शिरसाट, पै. धोंडिबा आडकर, पै. विश्वास वाघोले, पै. ऋषिनाथ शिंदे, पै. सुरेश आगळमे, पै. बाळू वाळूंज, पै. नारायण आडकर, पै. शंकर देशमुख, पै. बाळासाहेब काकरे, पै. किशोर सातकर, पै. चंद्रकांत शिंदे, पै. नवनाथ बोडके, पै.दिपक दाभाडे , संघाचे सल्लागार पै. राजू बच्चे, पै. देविदास कडू यांनी अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page