आधार फॉउंडेशन नि सफल फौंडेशन यांच्या आर्थिक आधाराने २५ महिला होणार सफल उद्योजक,मशीनरीचे वितरण

मावळ मराठा न्युज -लोणावळा, शहरातील आणि परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करत त्यांना व्यवसायिक बनविण्याचा निर्धार आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशन यांनी केला आहे. लोणावळ्यातील २५ गरजू महिलांना गृह उपयोगी वस्तू बनविण्याच्या मशीन सदर झालेल्या कार्यक्रमात वाटप करण्यात आल्या. त्या महिलांना सदर मशीनवर वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण आधार फाउंडेशन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ देखील मिळवूनदेण्याचे काम आधार फाउंडेशन करणार आहे.लोणावळ्यातील शेडगे हाईट्स येथील दत्त मंदिरासमोर हा मशीन वाटपाचा कार्यक्रम ग्रोथ विद्यापीठाचे संस्थापक लतेश शहा, सफल फाउंडेशन च्या श्रीमती नीता सुभाष गंगवार, अनुज गंगवार, आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे, ऍड . चेतन पंड्या, रिट्रेट हॉस्पिटीलिटी चे सुनील गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते सनी दळवी, पंकज काडे, मधु माधवन,भाऊ जाधव, अन्वर शेख,रेश्मा शेख,कांचन लुनावत,अपर्णा शेडगे, नामदेव डफळ,मनीषा भांगरे,भगवान घनवट, दत्तात्रय लाड यांच्यासह आधार फाउंडेशन आणि जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा मृदुला पाटील,संध्या गव्हले तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग तिखे व रश्मी शिरसकर यांनी केले. प्रकाश पाठारे यांनी उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले. लोणावळा आणि परिसरातील महिलांयाविषयी बोलताना आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे यांनी लोणावळा शहराला उद्योजकांचे शहर बनवण्याचा आमचा मानस आहे. तळागाळातील व वंचित घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या हाताला हक्काचे काम देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाची सुरुवात करताना लोणावळा शहरातील विविध भागातील २५ महिलांना गृह उपयोगी वस्तू बनवण्याच्या मशीन्स देण्यात आले आहेत पुढील काळामध्ये विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याच्या मशीन इतर महिलांना देखील देण्यात येणार आहेत. सफल फाउंडेशन व आधार फाउंडेशन यांनी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या महिलांना मशीन देण्यात आले आहेत त्यांना वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांना स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आधार फाउंडेशन व्यवसायाच्या रूपाने महिलांना मदत करणार आहे. लोणावळ्यातील महिलांना कार वॉश लिक्वीड बनविण्याचे मशीन, डिश वॉश लिक्वीड, टॉयलेट क्लिनर लिक्वीड, फ्लोअर क्लिनर लिक्वीड, बाथरूम क्लिनर लिक्वीड, गोधडी व रजई बनविणे मशीन, बॉबी व्हील, पॉप कॉर्न मशीन, स्क्रबर घासणी, टूथ ब्रश बनविणे, झाडू बनविणे, वायफर बनविणे आदी वस्तू बनविण्याच्या मशीन मोफत देण्यात आल्या

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page