पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारणी बरखास्त,नवीन कार्यकारणी निवडीसाठी बैठक संपन्न, १३ तालुक्यातील अध्यक्ष,पदाधिकारी उपस्थित



मावळ मराठा न्युज:- पुणे,मराठी पत्रकार परिषद मुंबई संचालित पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त झाल्याने नवीन कार्यकारणी निवडीसाठी रविवारी दि.१९ मे रोजी ११.३० वा. प्रतिभाताई पवार सभागृह कोंढवा पुणे येथे बैठक पार पडली आहे. मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यातील पत्रकार सभासद उपस्थितीत होते. नव्याने पुणे जिल्हा जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारणी निवडण्याबाबत मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या सुचनेनुसार मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक प्रमुख प्रा. सुरेश नायकवडे (परभणी) यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, सुनील वाळूंज, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, दत्ता भोंगळे, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील १३ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, कार्यकारणी सदस्य व जिल्हा प्रतिनिधींसह शंभरहून अधिक सभासद उपस्थितीत होते. २८ एप्रिलला झालेल्या चर्चेनंतर नव्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी प्रत्येक तालुका पत्रकार संघाने दोन सदस्यांची नावे जिल्हा कार्यकारणी सदस्यपदासाठी पाठविण्याच्या सर्वानुमतास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी संमती दिली होती. त्यानुसार पुणे जिल्हा कार्यकारणीसाठी इच्छूक सदस्यांच्या नावांचे प्रस्ताव तालुका संघांनी मराठी पत्रकार परिषदचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्याकडे पाठवले. त्या सर्व इच्छूकांना कार्यकारणी मध्ये कोणत्या पदावर काम करण्याची इच्छा आहे याबाबत लेखी अर्ज करण्याची सुचेना निवडणूक प्रमुख प्रा. सुरेश नायकवडे यांनी केल्या. यासाठी छापील अर्ज वितरीत करण्यात आले. एका तासाने अर्ज पुन्हा स्विकारण्यात आले. नवीन जिल्हा कार्यकारणीसाठी इच्छुकांच्या अर्जांवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे व निवडणूक प्रमुख प्रा. सुरेश नायकवडे हे चर्चा करुन पुढिल आठवड्यात कार्यकारणी जाहिर केले जाईल असे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जाहीर केले. या बैठकीत निवडणूक प्रमुख प्रा. सुरेश नायकवडे, शरद पाबळे, गणेश मोकाशी, एम.जी. शेलार, अनिल वडगुळे, अर्जुन मेदनकर, सतीश सांगळे, नरेंद्र जगताप, सावता झोडगे, बाबा तारे, हणूमंत देवकर, रमेश निकाळजे, बी.एम. काळे, संजय इंगुळकर, बापू पाटील, संजय बाराहते, महिला प्रतिनिधी सुजाता गुरव आदींनी निवडणूसंदर्भात मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत माजी अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले. बैठकीचे सुत्रसंचलन परिषदेचे राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले.




