महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरसोली टोल नाका ते खंडाळा दरम्यान खचलेल्या साईड पट्टा,खडे भरून डांबरीकरण साठी आयआरबी ला निवेदन

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, नुकतेच आय.आर. बी च्या कुसगावं कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे वरसोली टोल ते खंडाळा दरम्यान खचलेल्या साईड पट्टा, खडे भरून डांबरीकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच वरसोली टोल नाका येथील रोड लवकरात लवकर खुला करावा, नाले सफाई, अनधिकृत जाहिरात फलक, वलवन येथील ब्रीज सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी आय आर बी चे जोसवा व सुधीर पडवळ यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आपल्या मागण्यांन बाबत रस्ते विकास महामंडळ कडे पाठपुरावा करून लवकरच पूर्ण करू असे तोंडी आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. यावेळी महाराष्ट्र सैनिक संदीप लक्ष्मण पोटफोडे व कल्पेश गुरव उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page