महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळयात संवाद दौरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय ( A) रासप,मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा गुरुवार दिनांक २ मे रोजी लोणावळा शहरातील रामनगर,साने गुरुजी नगर, भुशीगाव,पंचशीलनगर या विभागात संपन्न झाला आज महायुतीचे उमेदवार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कार्य अहवालाचे वाटप शुभारंभ रामनगर येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. रामनगर,सनेगुरुजी नगर,भुशीगाव,पंचशीलनगर आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page