पत्रकार भवन पुणे येथे दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न




मावळ मराठा न्यूज़ ,पुणे , द ब्लाइंड वेल्थ ऑर्गनायझेशन आणि लायन्स क्लब तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी पत्रकार भवन येथे १२० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १८०० रुपयांचे धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पद्मविभूषण डॉ. संचेती – सुप्रसिद्ध उद्योजक कोहिनूर ग्रुपचे कृष्णकांत गोयल युवराज गाढवे- तळेगावचे जेष्ठ लेखक वक्ते डॉ. शालिग्राम भंडारी हे मान्यवर उपस्थित होते! यावेळी डॉ.संचेती यानी विद्यार्थ्यांचे कमालीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यशाला भारावून न जाता आपण असेच यश संपादन करत राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हा एक माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या संस्थेचे कार्य मी गेल्या पंधरा वर्षापासून पहात आहे आणि त्यांच्या प्रत्येक उपक्रमांना मी नेहमीच मदत करतो. आजही संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जागे करीता स्टॅम्प ड्युटीचा खर्च स्वतः कोहिनूर ग्रुप करेल अशी ग्वाही दिली. प्रमुख पाहुणे ला. डॉ. शालिग्राम भंडारी यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपण स्वतःला कधीच कमी लेखू नका, आपण हे जग केवळ जगण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी आलेलो आहोत. हे विविध काव्यपंक्ती- शेरोशायरी आणि दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण भारस्कर यांचेही मनापासून अभिनंदन आणि कौतुक करीत असताना भंडारी यांनी गुरुवर्य डॉ. संचेती व बहुआयामी व्यक्तिमत्व श्री कृष्णकुमारजी गोयल यांचेही या संस्थेस सक्रिय सहाय्य आहे म्हणून त्यांच्याविषयीही कृतज्ञता आपल्या मनोगतात व्यक्त केली. ला. दीपक बाळसराफ यांनी डॉ.संचेति आणि कृष्णकुमार गोयल या उभयतांचा परिचय अतिशय समर्पक शब्दात करून दिला. त्याबरोबरच उत्तम अर्थपूर्ण शब्दात सूत्रसंचालन सौ अनिता बाळसराफ यांनी केले . मॉडर्न महाविद्यालयाच्या डॉ. सौ पुराणिक यांनी संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तळेगाव इनरव्हील क्लबच्या डॉ. सौ दिपाली झवर यांनी विद्यार्थ्यांच अभिनंदन करून त्यांना संबोधित करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रजलाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेचा परिचय मान्यवरांना करून दिला तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संचालक दिनेश मुसळे व नामदेव बारापात्रे डॉ. दिपाली ईश्वर झवर् व लायन्स क्लब तळेगाव यांचे विशेष योगदान लाभले.




