संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान व वृक्ष लागवड
मावळ मराठा न्यूज :-लोणावळा,संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिन निमित्त महास्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजीत केलेला होता. याप्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व मान्यवर व कार्यकर्ते तसेच लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे सकाळी ८ .०० वाजता नगरपरिषदेच्या कार्यालय समोर एकत्रित झाले त्यानंतर पर्यावरण प्रतिज्ञा घेण्यात आली. शहरातील विविध भागात महास्वच्छता अभियान व वृक्षारोपण करणेबाबत सूचना दिल्या. याप्रसंगी लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे, स्वच्छता विभागप्रमुख विनोद बोरकर, सिटी को ऑर्डीनेटर विवेक फडतरे, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, मावळ वार्ता प्रतिनिधी प्रदीप वाडेकर उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगरपरिषदेच्या हद्रदीतील रायवुड सिद्धेश्वर मंदिर परिसर, ठोबंरेवाडी टाटा डॅम परिसर मैदानावर, खंडाळा मरिमाता मैदानावर, खंडाळा तलाव परिसर या ठिकाणी १० ते १५ फुट उंचीची ५०० झाडे यात प्रामुख्याने पिंपळ, पिवळा चाफा, करंज, तामण,वड हया झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याकरीता श्री.संजय वोरा साई ज्योत ट्रस्ट यांचेवतीने ७० झाडे, श्री.अबुबकर फर्निचरवाला यांचेवतीने ५० झाडे, श्री.अमित वधवानी यांचेवतीने २० झाडे नगरप२०२४ रिषदेला उपलब्ध करुन दिलेली आहे. या प्रसंगी उदयान विभागातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता श्री.पंढरीनाथ साठे व उदयान विभागाचे जितेंद्र राऊत यांनी वृक्षारोपणाकरीता खड्डे व वृक्षारोपणा बाबतचे नियोजन केले. तसेच शहरातील विविध भागात कार्यकर्त्याच्या टीम बनवून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये रस्तासफाई, रस्त्याचे बाजूने पडलेला कचरा साफ करण्यात आला त्यानंतर नगरपरिषदेच्या कचरागाडया मार्फत सर्व कचरा गोळा करण्यात आला. याकरीता नगरपरिषदेच्या विविध अधिकारी पर्यवेक्षक म्हणून नेमलेले होते तसेच स्वच्छता विभागातील सर्व मुकादम व कर्मचारी यांनी यात सहभाग नोंदविला याकरीता श्री.विनोद बोरकर यांनी स्वच्छतेबाबत नियोजन केले होते. तसेच लोणावळयात येणा-या पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घ्यावा परंतू कचरा हा उघडयावर टाकू नये सर्वानी झाडे लावावी असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले.