भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिन आंतर भारती बालग्राम येथे उत्साहात साजरा


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा-लोणावळ्यातील प्रसिद्ध व निसर्ग रम्य अशा भुशी धरणाच्या परिसरात वसलेल्या आंतर भारती बालग्राम स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी हडपसर येथील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या व सखी भ्रमंतीच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई गायकवाड, लो.न.पा.च्या माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे, लोणावळा वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य हर्षल होगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व जमलेल्या जनसमुदायांची मने जिंकून घेतली .या प्रसंगी विद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ. संदेश कदम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशातील खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये खडतर प्रवास करून सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 हिरोंचा माहिती दिली व खऱ्या अर्थाने चित्रपटातील हिरो पेक्षा हे हिरो आपल्या देशाचे आदर्श आहेत हे पटवून दिले. याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा यशोचित सन्मान आणि सत्कार विद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ. संदेश कदम आंतर भारती बालग्राम च्या प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. शुभांगी भोर यांच्या शुभहस्ते संस्थेचे प्रतिकात्मक सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.विद्यालयाची हेड गर्ल सिद्धी कदम हिने आभार प्रदर्शन केले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.




