उपविभागीय अधिकारी,मावळ,मुळशी यांचा आज प्रथमच वडगांव मावळ येथे सुनावणी बोर्ड सुरु

मावळ मराठा न्युज – वडगांव,माननीय उपविभागीय अधिकारी,मावळ,मुळशी यांचा आज प्रथमच वडगांव मावळ येथे सुनावणी बोर्ड सुरु झाला त्यावेळीं वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे त्यांचे स्वागत करणेत आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, ॲड धनंजय कोद्रे, सचिव ॲड अक्षय रौंधल उपस्थित होते.आठवड्यातून २ दिवस येथे बोर्ड असणे गरजेचे आहे, तसेच दाखल विभाग पण येथे सुरु करावा, इतर सर्व प्रकरणाची देखिल सुनावणी येथेच व्हावी अशी मागणी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page