मातंग समाज जनजागृती अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्यासाठी भव्य मोर्चा काढणार -युवराज दाखले




मावळ मराठा न्युज:-पिंपरी,प्रतिनिधी,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मेट्रो स्टेशन होत असून या मेट्रो स्टेशनमुळे स्मारक पूर्णपणे झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाच्या विरोधात भव्य मोर्चा संदर्भात काल सायंकाळी सात वाजता विद्यानगर,रामनगर, दत्तनगर या तिन्ही झोपडपट्ट्यातील कार्यकर्त्याची मीटिंग आयोजित करण्यात आली या मीटिंगचे नियोजन विठ्ठल कळसे यांनी केले होते. मिटींगचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांनी भव्य मोर्चा संदर्भात समाज बांधवांना सूचना केल्या त्यात त्यांनी पुढील मुद्दे मांडले.१) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक शेजारील महा मेट्रोचे काम व कामाचे ठिकाण बदलण्यात यावे.२)सांस्कृतिक भवन निगडी येथील मातंग समाजासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केलेल्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. व सांस्कृतिक भवन समाज बांधवांसाठी खुले करण्यात यावे.३ ) संत तुकाराम नगर येथील हाफकींच्या जागेमध्ये बार्टी च्या धरतीवर आर टी ची स्थापना करण्यात येण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ठराव मंजूर केलेल्या महानगरपालिकेच्या ठरावावर लवकरात लवकर तोडगा काढून केंद्र शासनाकडून सदर जागा हस्तांतरित करून घेण्यात यावी व आर टी चे काम त्वरित चालू करावे. या सर्व मूलभूत मुख्य विषयांवर चर्चा केली. यावेळी जयंती महोत्सव अध्यक्ष अण्णासाहेब कसबे उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, डीपी खंडाळे, रामदास कांबळे, मयूर जाधव, आबा मांढरे, अनिल गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.




