लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी साबळे यांचे कार्यालय दुसऱ्या माळ्यावर तर तिसऱ्या माळ्यावर का बसतात? – सूर्यकांत वाघमारे

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची सलग तिसऱ्यांदा मावळ लोकसभेच्या खासदार पदी प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल खासदार यांचा महायुती लोणावळा शहराच्या वतीने हॉटेल कृष्णाई येथे ” भव्य नागरी सत्कार ” करण्यात आला. यावेळी आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना कमी लिड मिळाल्याची मिमांसा करताना याला सर्वस्वी प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद केले.त्यांनी पुढे बोलताना लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे हे नागरिकांना भेटत नाहीत,त्यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत.त्यांचे कार्यालय दुसऱ्या माळ्यावर असताना ते तिसऱ्या माळ्यावर रात्री उशिरा पर्यंत ते काय करत बसतात?आणि नागरिक संध्याकाळ पर्यंत दुसऱ्या माळ्यावर तात्काळत त्यांची वाट बघत बसतात. त्यामुळे लोणावळ्यातील विकास कामांचा बोजवारा उडाला आहे असेही सूर्यकांत वाघमारे यांनी नवनिवार्चित खासदार श्रीरंग बारणे यांच्या भव्य नागरी सत्कार प्रसंगी नमूद केले. यासंदर्भात आपण लोणावळ्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी ती नागरिकांना काय चाललं आहे हे कळण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी केली.लोणावळा नगरपरिषद ही एक स्वायत्त संस्था आहे.छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण चे भूमिपूजन केले त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही.याबद्दल देखील वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली.अशी मोठी लिस्ट आहे त्यामुळे तुमच्या मताची टक्केवारी घटण्याचे मुख्य कारण अधिकारी असल्याचा पुनरुच्चर वागमारे यांनी केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page