अडीच वर्षे प्रलंबित प्रकाश पोरवाल यांच्या अतिक्रमण वर कारवाई करणारा लोणावळा नगरपरिषदेचा धाडसी मुख्याधिकारी पंडित पाटील


मावळ मराठा न्यूज,:- लोणावळा,माहिती अधिकार कार्यकर्ता प्रकाश पोरवाल यांनी इंद्रायणी नदीवर भराव टाकून केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश वेळोवेळी राष्ट्रीय हरीत लवाद न्यायालयाने देउन सुद्धा काही तरी खोडसाळपणा करुन प्रकाश पोरवाल हे सदर बांधकाम पाडण्यास अडचण निर्माण करत होते. न्यालयालाने दिलेल्या आदेशावर कारवाई होत नाही म्हणून २० लाख दंड देखील पालिकेला ठोठावला होता.सदर बाब न्यायालयाच्या देखील निदर्शनास आली असून यावेळी मात्र लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी कुणालाही भीक ना घालता, कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपली न्यायालयाच्या आदेशा नुसार धडक कारवाई केली आहे.त्यामुळे दोन अडीच वर्षे प्रलंबित अतिक्रमणवर हातोडा मारण्याची हिम्मत आणि पोरवाल यांच्या उपद्रव मुल्यास भीक न घालता शासकीय अधिकारीने जर ठरवले जनतेच्या हिताचे निर्णय घेवून एक आदर्श घालू शकते अशी कामगिरी पंडित पाटील यांनी केली आहे. लोणावळा नगरपरीषदेने पोरवाल याचे बेकायदेशीर अतिक्रमण हटावण्याची मोहीम हाती घेतली तेव्हाच पोरवाल हे जेव्हा जेसीबी मशीनपुढे झोपून सरकारी कामात अडथळा निर्माण करत होते तेव्हाच लोणावळा शहर पोलिसांनी त्याचेवर कारवाई करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही म्हणून सदर अतिक्रमण तोडता आले नाही असे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी राष्ट्रीय हरित लवाद कडे सादर केलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. तसेच एस पी कार्यालयातून स्थानिक पोलिसांना पोरवाल वर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी देखील मुख्याधिकारी यांनी प्रतिज्ञा पत्रात केली आहे. प्रकाश पोरवाल याच्यावर १५३ गुन्हा दाखल करुन सदर अतिक्रमण काढता येईल व त्यासाठी थोडा कालावधी देखील वाढवून देण्यात यावा अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र मे. न्यायालया यांचे समोर श्री पंडित पाटील यांनी दाखल केले आहे.सदर प्रकरणी मे. न्यायालय यांनी आदेश पारीत करुन पोरवाल यांना चांगलाच दणका दिला आहे. पोरवाल याचे अतिक्रमण येत्या ४५ दिवसात काढण्याचे आदेश दिले आहेत. जर या कालावधीत सदर अतिक्रमण नाही हटवले गेले तर पोरवाल व नगरपरीषद या दोघांना त्याबाबत न्यायायाचा रोष अंगावर घ्यावा लागेल हे स्पष्ट झाले आहे.




