भाजप शिष्टमंडळाने घेतली लोणावळा नगरपरिषद हद्दीतील विकास कामासंदर्भात कोर्टकमिटीची भेट

मावळ मराठा न्युज:-लोणावळा, लोणावळ्यातील विकास कामे संदर्भात लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,श्रीधर पुजारी,लोणावळा शहर भाजप शहर अध्यक्ष अरुण लाड,देविदास कडू,बाळासाहेब जाधव,रामविलास खंडेलवाल आदिनी कोर्ट कमिटी बैठकीला कोर्ट कमिटी सदस्य मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. एस. राधाकृष्णन, निवृत्त मुख्य सचिव जगदीश जोशी, निवृत्त नगररचना संचालक व्ही. डब्ल्यू. देशपांडे, स्थानिक प्रतिनिधी तनु मेहता व दिनेश राणावत,मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे उपस्थित होते. शहरात सुरु असलेल्या विकास कामाबद्दल वेळ घेऊन विविध विषयावर चर्चा केली यात खंडाळा तलाव,दुर्गंधी आणि हजारो मासे मेल्याने तेथील नागरिकांचा निर्माण झालेला आरोग्यचा प्रश्न,तेथील अतिक्रमण,भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामात होणारा विलंब आणि यामुळे लोणावळ्यातील नागरिकांना होणारा त्रास,याबाबत उहापोह करण्यात आला.सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांनी प्रत्येक मिटिंग ला लोणावळ्यातील विविध प्रश्न बद्दल काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते त्यावेळी दोन विषय घेण्याचे ठरले असताना तें का सोडवले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला.तर आज झालेल्या मिटिंग मध्ये खंडाळा तलाव सुशोभीकरण काम सुरु करावे तेथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित काढावे आणि रेल्वे ब्रिज चे काम युद्धपातळीवर करावे अशी भूमिका भाजप शिष्टमंडळाने यावेळी कोर्ट कमिटी समोर मांडली. नांगरगाव भागात पुलाच्या खांबा शेजारी मागील वर्षभरात तयार झालेल्या इमारतीचा मुद्दा आज प्रामुख्याने हायकोर्ट कमिटी समोर उपस्थित करण्यात आला.बाळासाहेब जाधव, अरुण लाड व देविदास कडू यांनी या इमारतीचे फोटो समिती सदस्यांना दाखविले. तसेच ही परवानगी कशी देण्यात आली, याबाबत चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. माजी नगरसेवक देविदास कडू यांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धती नाराजी व्यक्त करत तुम्ही वेळेवर कामें करत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते.मागील वेळेस झालेल्या मिटिंग मध्ये में २०२४ ला रेल्वे ब्रिज लोकांसाठी सुरु होणार असे प्रशासनकडून सांगण्यात आले होते. परंतु तसें झाले नाही तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी कडू यांनी केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page