“कदम से कदम मिलाते चलो” लायन्स संवादयात्रेला लोणावळ्याहून प्रारंभ तर वाकड, पुणे येथे सांगता








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ चे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन मार्केटिंग ला. सुधीर कदम यांच्या नेतृत्वाखाली “कदम से कदम मिलाते चलो” या संवादयात्रेचे आयोजन करण्यात आले. लायन्स सदस्यता वाढवणे या उद्देशाने निघालेल्या संवादयात्रा टीममध्ये डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन इमेज बिल्डिंग ला. अमीन वाडीवाला, लोणावळा सुप्रीमो अध्यक्ष ला. सुरैया वाडीवाला, ला. विश्वनाथ पुट्टोल यांनी सक्रिय सहभाग घेतला.गुरुवार दि. २७ नोव्हेंबर सायंकाळी ६.०० वा. मॅपल लॉन्स लोणावळा येथे संवाद यात्रेस विधिवत प्रारंभ करण्यात आला. संवाद यात्रेसाठी बनवण्यात आलेल्या विशेष गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उप-प्रांतपाल श्रेयस दीक्षित, जी एम टी समनव्यक प्रीती दीक्षित व झोन चेअर पर्सन देवल पारख यांनी संवाद यात्रेस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. लोणावळा व परिसरातील सर्व क्लब प्रतिनिधी बहूसंख्येने याप्रसंगी सहभागी झाले. ला. सुधीर कदम यांनी आपल्या सादरीकरणातून मिशन १.५, लायन्स मार्केटिंग व सदस्यता वाढ याबाबत संवाद साधला. ला. अमीन वाडीवाला यांनी प्रास्ताविक तर ला. सुरैया वाडीवाला व ला. विश्वनाथ पुत्तोल यांनी आभार मानले. लोणावळा सुप्रीमो सदस्यांनकडून संवादयात्रा टीमचे औक्षण करण्यात आले. दि. २८ नोव्हेंबर दुपारी १.०० वा. हॉटेल रुद्राक्ष चाकण येथे जेष्ठ लायन ला. संतोष सोनावळे यांच्यासह चाकण व चाकण सफायर क्लब सदस्यांनी संवादयात्रेचे स्वागत केले. सायंकाळी ५.०० वा हॉटेल सुखसागर नारायणगाव येथे जुन्नर – शिवनेरी व नारायणगाव क्लब सदस्यांनी संवादयात्रेचे स्वागत केले. ला. सुधीर कदम यांनी उपस्थित लायन सदस्यांसोबत संवाद साधला. जुन्नर शिवनेरी क्लब अध्यक्ष ला. मच्छिन्द्र मुंडलिक, माजी झोन चेअरपर्सन ला. योगेश रायकर व जेष्ठ लायन मनोज बलघट यांसकडून संवाद यात्रेस शुभेच्छा देऊन सदस्यता वाढीबाबत आश्वासित करण्यात आले. शनिवार दि. २९ नोव्हेंबर सकाळी ग्रीन स्केवेर हॉल नाशिक येथे “कदम से कदम मिलाते चलो” या संवादयात्रेचे माजी रिजन चेअरपर्सन ला. राजू व्यास व जी एस टि समनव्यक ला. सचिन शहा यांच्यासह नाशिक रिजन मधील सर्व क्लब सदस्यांनी स्वागत केले. प्रांतपाल राजेश अगरवाल व माजी प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी उपस्थितांस मार्गदर्शन केले. खुल्या चर्चेत जेष्ठ लायन सदस्यांसह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. सर्व उपस्थित अध्यक्ष व प्रतिनिधी यांनी संवादयात्रा उपक्रमाचे कौतुक केले व नवीन सदस्य वाढ करणेबाबत आपली कटिबद्धता व्यक्त केली. ला. राजू व्यास व ला. विश्वनाथ पुत्तोल यांनी शनिवार दि. ६ डिसेंबर सायंकाळी ४.०० वा झोन चेअरपर्सन ला. संजय उबाळे व राहता येथील क्लब सदस्यांनी राहता ग्रामीण रुग्णालय येथे संवादयात्रा टीमचे औक्षण करून स्वागत केले. लायन्स क्लब राहता व राहता सह्याद्री क्लब अध्यक्ष तसेच सदस्य बहूसंख्येने उपास्थित होते.शनिवार दि. ६ डिसेंबर सायंकाळी ६.०० वा. हॉटेल रॉयल रूद्रा शिर्डी येथे नगर रिजन मधील क्लब सदस्यांनी संवादयात्रेचे जोरदार स्वागत केले. ला. महेश वैद्य, लीओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दर्शन वैद्य व क्लब अध्यक्षांसह महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ला. अमीन वाडीवाला यांनी प्रास्ताविक केले. शिर्डी, राहता, कोपरगाव व नगर रिजन मधील सदस्यांना ला. सुधीर कदम यांनी आपल्या सादरीकरणातून मिशन १.५, लायन्स मार्केटिंग व सदस्यता वाढ याबाबत मार्गदर्शन केले. खुल्या चर्चेत ला. एकनाथ गोंदकर, ला. अभिजित आचार्य व ला. सुधीर डागा या जेष्ठ लायन सदस्यांसह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. ला. विश्वनाथ पुट्टोल यांनी आभार मानले.दि. ७ डिसेंबर सकाळी ११.०० वा नगर शहर मधील सदस्यांसोबत संवादयात्रा टीमनी संवाद साधला. जेष्ठ लायन हरजीतसिंग वधवा व अध्यक्ष ला. संजय असणानी यांच्यासह लायन्स सदस्य उपस्थिती होते.मंगळवार दि. ९ डिसेंबर सकाळी ११. ३० वा. लायन्स क्लब पुणे अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटर साईनगरी,चंदननगर, पुणे शहर येथे संवादयात्रा टीमचे स्वागत प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी केले. ला. वि. के. शर्मा, ला.रवी अगरवाल व ला. उमेश अगरवाल यांच्यासह पुणे अग्रसेन क्लब सदस्यांच्या उपस्थितीत अनुर्वी मेडिकल फौंडेशन, येरवडा, पुणे येथील सेण्टरला संवादयात्रा टीमने भेट दिली.दि. ९ डिसेंबर सायंकाळी ५.०० वा. हॉटेल गझेबो वाकड पुणे येथे “कदम से कदम मिलाते चलो” संवादयात्रा सांगता समारंभ आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संचालक अनुमोदित राज मुछाल, मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन विजय सारडा, उप-प्रांतपाल। श्रेयस दीक्षित, उप-प्रांतपाल ॥ राजेंद्र गोयल, जी एम टी समनव्यक प्रीती दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संवादयात्रा सांगता समारंभ संपन्न झाला.



