लोणावळ्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ हेमंत अग्रवाल यांचा आरोग्य क्षेत्रातील क्रांती घडवणारा पण अचंबित करणारा जीवन प्रवास









मावळ मराठा न्यूज अत्यंत साध्या परिस्थितीतून प्रगतीची शिखरे गाठत अस्थिरोग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. हेमंत अग्रवाल अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. गेल्या २८ वर्षांपासून हाडांचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अग्रवाल यांनी आतापर्यंत ६० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवजीवन दिले आहे. लोणावळ्यातील १५ बेडच्या ‘यश हॉस्पिटल’चे ते संचालक आहेत.डॉ. अग्रवाल यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. वडिलांच्या किराणा दुकानात काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९९३ मध्ये मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस, तर १९९६ मध्ये कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून अस्थिरोग विषयातील उच्च शिक्षण पूर्ण केले. १९९८ पासून त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक डॉ. हेमंत अग्रवाल कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले. २००२ मध्ये अध्यक्ष म्हणून एका वर्षात ४०० उपक्रम यशस्वीपणे पार पाडून ‘साप्ताहिक मावळ नागरिक’ आणि ‘सेवा सद्भावना’ पुरस्कार मिळवले. पुढे २०१३ मध्ये झोन चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी मिळवला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गौरवही२०१५ मध्ये त्यांनी ‘प्लांट स्टेमसेल थेरपी’वर संशोधन सुरू केले, ज्यामुळे अल्पावधीतच ३८ हजारांहून अधिक लोकांना त्याचा लाभ झाला. या कार्यासाठी त्यांना दोन वर्षांत ७९ पुरस्कार मिळाले. २०१९ मध्ये रक्तदान शिबिराद्वारे ४४ हजार रक्ताच्या पिशव्या संकलित करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. अलीकडील काळात ‘डीएनए ब्लूप्रिंट’ आणि ‘मिशन वन नोट वन नॉट आउट’ यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी ‘आरोग्य क्षेत्रात नवे आयाम निर्माण केले आहेत. दुबई, कझाकिस्तान आणि स्वित्झर्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे कार्य गौरविण्यात आले आहे. सध्या ‘डीएनए ब्लूप्रिंट’ च्या १००० हून अधिक केसेस पूर्ण झाल्या असून पुढील काळात संकल्प आहे. ‘रेजेन एससी’ १००० सेंटर उभारण्याचा त्यांचा प्रकल्पाद्वारे सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्याचा आधुनिक उपचार स्पष्टपणे दिसून येतो. त्यासाठी त्यांचं नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आले.२०१९ मध्ये Lions international madhe डेप्युटी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ही पदवी त्यांना भेटली. एका वर्षात ८०० कार्य व चार करोडची सेवा देण्यात आली. त्यासाठी त्यांना इंटरनॅशनल प्रेसिडेंट मेडल देऊन गौरवण्यात आले.२०२२ पासून त्यांनी डीएनए ब्लू प्रिंट व “मिशन वन नोट वन नॉट आउट” वर काम केले.डीएनए ब्लू प्रिंट हे मेडिकल क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत त्यात त्यांना खूप प्रोत्साहन मिळाले.व्हॅलेंटाइन बरोबर डीएनए ब्लू print प्रोजेक्ट घेऊन व्हॅलेंटिना डीएनए ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटर चालू केले.ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची मीटिंगदुबई हेल्थ authority बरोबर झाली. आणि नोव्हेंबर २०२५ रोजी दुबईमध्ये डीएनए ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटरचा हेडकॉटर सुरू झाला.नोव्हेंबर २०२५ मध्ये नवभारत इंटरनॅशनल बिझनेस Excellence समिट कजाकिस्तान अलमाटी मध्ये पार पडला. तिथे त्यांनी डीएनए प्रेसेंटेशन दिले व त्यांना त्यांच्या कार्यासाठी इंटरनॅशनल एक्सिलेन्स पुरस्कार सो अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले.या समितीमध्ये पॅनल डिस्कशन आयोजित केले गेले होते. त्यात भारताचे टॉप डॉक्टर्स जसे रुबी चे सीईओ ,डी वाय पाटील चे डीन Almaty चे डॉक्टर्स हे डिस्कशन पॅनल मध्ये होते.त्या पॅनल डिस्कशन मध्ये डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी डीएनए ब्लू प्रिंट ची माहिती दिली. आणि इंडिया कझाकिस्तान टायप मधला पहिला प्रोजेक्ट Dna ब्लूप्रिन्ट करावा असा डॉक्टरांचा सल्ला झाला.जनवरी २०२६ मध्ये स्वीटझरलंद मध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरम मध्ये त्यांनी डीएनए ब्लू प्रिंट बद्दल माहिती दिली.डीएनएच्या कार्यासाठी त्यांना स्वीटझरलंड मध्ये चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात आला. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम कडून त्यांना मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज उदय सामंत यांचे कडून इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात आले.स्वित्झर्लंड दाऊस मध्ये महाराष्ट्र सरकारकडून ४० इंडस्ट्रियलईस्ट ची निवड झाली होती. त्यात व्हॅलेंटिनाचा सहभाग होता. डीएनए इंटरॅक्शन अमेरिका ,लंडन ,ऑस्ट्रेलियाचे इंडस्ट्रीलीस्ट बरोबर केले.१४ फेब्रुवारी रोजी त्यांनी त्यांचा पहिला डीएनए पोडकास्ट लॉन्च केला.लोकमततर्फे २८ मार्च २०२६ रोजी त्यांना हेल्थ आयकॉन अवॉर्ड पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडून देण्यात आला.आता त्यांनी व्हॅलेंटिना बरोबर प्लांट स्टिमसेल रिसर्च थेरेपी चा प्रोजेक्ट सुरू केला.प्लांटस्टेम सेल थेरेपी हे Regen Sc या नावाने उपलब्ध होईल.त्याचा पोडकास्ट लवकरच करण्यात येईल.आतापर्यंत डीएनए ब्लू प्रिंट १००० प्लस लोकांचे करण्यात आले असून. पुढील एका वर्षात १०० डीएनए सेंटर आणि पुढील तीन वर्षात १००० डीएनए सेंटर प्रोजेक्ट बनवला आहे.Dna ब्लू प्रिंट आणि प्लांटस्टेम सेल थेरेपी Regen Sc चे फाउंडर डॉक्टर हेमंत अग्रवाल यांचा एकच ध्येय आहे की ते सर्व समाजातील सर्वच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.साप्ताहिक मावळ नागरिक,एम एन न्युज आणि मावळ मराठा न्युज परिवाराकडून त्यांना पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा,त्याचेकडून अशीच गोर गरीब यांची सेवा घडत राहो हीच पुन्हा शुभेच्छा.



