पाडव्याच्या मुहूर्तावर लोणावळ्यात उडीद पापड,खीचे पापड,शेवया बनवण्याचे श्री नारायणी अग्रो प्रॉडक्ट्स चे युनिट सुरु,अनेक मान्यवरानी दिल्या शुभेच्छा



मावळ मराठा न्युज – लोणावळा,गुढी पाडव्या निमित्त लोणावळ्यात प्रथमच उडीद पापड,शेवया आणि तांदळाचे खीचे पापड निर्मिती करणार श्री नारायणी अग्रो प्रॉडक्ट्स यांनी छोटेसे युनिट सुरु केले आहे यात उडीद पापड,खीचे पापड शेवया याबरोबरच स्वादिष्ट नाचणी पापड,सणा सुधीसाठी लागणाऱ्या कुरडई,विविध मसाले,मिरची पावडर,अत्यंत माफक भावात उपलब्ध होणार आहेत.शिवाय आपण उडीद पापड पीठ आणि मसाला आणून दिल्यास तासाभरात आपले पापड देखील मजुरीवर तयार करुन देण्याची सेवा श्री नारायणी अग्रो प्रोडक्ट्स येथे उपलब्ध असणार आहे. पाडव्या च्या शुभ मुहूर्तावर सुरु झालेल्या या प्रकल्पला लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप पी एस आय रमेश भिसे,जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,उपाध्यक्ष मृदुला पाटील,गोरख चौधरी,सचिव रश्मी शिरस्कर,सुनील पाणगांवकर,प्रसिद्ध दिग्दर्शक बल्ली भाई ग्रोवर,यांनी भेट देऊन श्री नारायणी अग्रो प्रॉडक्टचे उत्पादने विकत घेत शुभेच्छा दिल्या. तरी लोणावळेकर नागरिक आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायणी अग्रो प्रॉडक्टचे संचालक संजय पाटील यांनी केले आहे.




