माध्यमिक विद्यालय भांडगावात मुख्याध्यापक श्री सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात

मावळ मराठा न्युज :-भांडगाव, २९ जून २०२४ : माध्यमिक विद्यालय भांडगाव येथे मुख्याध्यापक श्री सुभाष गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने एक विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे श्री गायकवाड यांच्या मातोश्री, श्रीमती भागुबाई किसन गायकवाड यांच्या ९५ व्या वाढदिवसाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच, श्री तुळशीराम किसन गायकवाड यांचा ७५ वा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी ह.भ.प. चाळक महाराजांनी कीर्तन सेवा दिली.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री अशोक भाऊ घोगरे, अध्यक्ष भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान, बावडा, मा. श्री विजयराव घोगरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, औरंगाबाद आणि मा. श्री डॉ. लक्ष्मण आसबे, अध्यक्ष, कामधेनू सेवा परिवार यांचा समावेश होता. या सोहळ्यात सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल पाटील सरांनी केले. डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मुलांच्या भावी पिढीच्या घडणीसाठी मार्गदर्शन केले. अशोक भाऊ घोगरे यांनी मुख्याध्यापक श्री सुभाष गायकवाड यांच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.मुख्याध्यापक श्री सुभाष गायकवाड यांना त्यांच्या दीर्घ आणि फलदायी सेवेसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप आनंददायी वातावरणात झाला.कार्यक्रमाच्या शेवटी श्री बागल सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि जेवण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page