आंबवण्यात माजी विध्यार्थिनींनी विद्यालयात एकत्र येत भरवली शाळा,रंगला खेळ पैठणीचा

मावळ मराठा न्यूज:-आंबबणे, सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या २००१ ते २०२२ पर्यंतच्या सर्व माजी विध्यार्थिनींनी आपल्या गत काळातील आठवणीना उजाळा देण्यासाठी विद्यालयात स्नेह मेळावा आयोजित केला. आंबवण्याच्या मा.आदर्श सरपंच सौ. वत्सलाताई वाळंज यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलींचा आनंद वाढेल या हेतूने त्यांच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला. सु प्रसिद्ध सूत्र संचालक प्रदीप वाडेकर यांनी खेळ अतिशय प्रभावी पणे पार पाडला अरुणा शेलार/ हुंडारे प्रथम क्रमांक ,वैशाली मराठे/ दळवी द्वितीय क्रमांक ,पुजा मोढवे तृतीय क्रमांक , रेखा गोणते / मानकर उत्तेजनार्थ खेळातील विजयी मानकरी ठरल्या. मा.जयेश शेठ मुंबई मा. नंदकुमार वाळंज ,सौ. कविता जयेश शेठ , उमा मेहता राष्ट्रवादी महिला अध्यक्षा लोणावळा, सौ. मीनाक्षी गायकवाड सुप्रशिद्ध गायिका, सौ. रसिका तळेगावकर मा.वत्सलाताई वाळंज ,मा. मुख्याध्यापक देवरे सर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. शाळा व शिक्षकांविषयी आठवणी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात व्यक्त होताना विद्यार्थिनी अत्यंत भाऊक झाल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत मा. वत्सलाताई वाळंज यांच्या ६३ वा वाढदिवस साजरा केला. व सर्वांनी अभिष्टचिंतन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उल्हास भाऊ मानकर यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थिनींना स्मृती चिह भेट देऊ केली. हळदी कुणकवाचा कार्यक्रम व भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी , तसेच मंदा दळवी सुजाता वळंज ,अंकिता जंगम यांनी मेहनत घेतली.माजी विध्यार्थिनींनी रंगवला खेळ रंगला पैठणीचा…

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page