आषाढी वारी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।।

मावळ मराठा न्युज :-मिरासी म्हणजे वतनदारी.वतनदारी वारसाहक्काने पुढच्या पिढीला मिळते.तुकाराम महाराज इथे वतनदारी पुढच्या पिढीला देतात पण ती लौकिकार्थाने दिली जाणारी वतनदारी नाही,वारसा नाही, तर ती आहे पांडुरंगाच्या चरणसेवेची वतनदारी,नामाचा वारसा..हौसेला मोल नाही हे खरेच पण.संस्कारक्षम वयात आपण हौस या सदरात मुलांना काय देतो हे आमच्यावेळी नाही मिळालं,त्याचं नशीबाने मिळतंय तर देवू च्या स्वरूपात त्यांना चुकीच्या सवयी तर लावत नाही ना?हे बघावं लागेल.ते लौकिकार्थाने वतनदारासारखे वागले तर तुमचं वतन खालसा व्हायला वेळ कितीसा लागेल?इथेही वारकरी संप्रदाय वेगळा ठरतो.इथे मिरासी मिळते ती, पांडुरंग सेवेची,वारसा मिळतो तो नामाचा,हौस पुरविली जाते ती टाळ, मृदुंग,वीणेची ‘ निश्चितच हे संस्कार,ही हौस या बालकाला ,त्यांच्या पिढीला सुध्दा चिरंतन वारसाने देईल ते शाश्वत सुखच.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page