लायन्स क्लब तळेगाव आयोजित सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास शिबिर”- उद्घघाटन संपन्न


मावळ मराठा न्यूज:- तळेगांव, एक मे महाराष्ट्र दिनाच औचित्य साधून ज्येष्ठ डॉ.शाळीग्राम भंडारी यांच्या शुभहस्ते ला. मयूर राजगुरव यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे दीप प्रज्वलन करून विधिवत उद्घघाटन झाले! हे उन्हाळी शिबिर दिनांक एक मे ते सात मे- या दरम्यान सकाळी आठ पासून तर संध्याकाळी सात पर्यंत हे शिबिर सहभागी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहील! या शिबिरात- स्केटिंग कराटे, नृत्य, लाठी काठी, बुद्धिबळ अशा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जानार आहे. ते केवळ पाचशे रुपयाच्या नाममात्र फी घेवून! विद्यमान ला. अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि लायन्स सभासदांचे मनःपूर्वक स्वागत केलं! प्रास्ताविकात लायन क्लबच्या या शिबिर भरवण्या मागील भूमिका स्पष्ट करून विविध विभागात प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला! त्यात- कराटे शिकवणारे प्रफुल कावले! स्केटिंग शिकवणारे-राहुल लोंबार! चेस शिकवणारे- लक्ष्मण पवार! लाठी काठी शिकवणारे- रवींद्र जगदाळे आणि खास बॅडमिंटन शिकवणारे युवराज पारगे यांचा समावेश होता! यावरील शिक्षकांचे विद्यार्थी राज्य आणि देशपातळीवर- स्पर्धेत यशस्वी ठरलेले चॅम्पियन आहेत! शिबिराचे उद्घघाटक ज्येष्ठ ला. डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्तिमत्व विकासात आपला आहार ,विहार आणि विचार हा किती महत्त्वाचा आहे हे विविध उदाहरणातून विशद केले! त्यात पालकांचा- शिक्षकांचा आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे! त्याशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही हे अनेक उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले! या शिबिराचं उत्तम आयोजन आणि नियोजन करण्यासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यात- हेल्थ क्लब चेअरमन ॲड. ला. मनोहर दाभाडे, ला. मयूर राजगगुरव- ला. राजेंद्र झोरे- ला. प्रकाश पटेल- ला. भरत पोद्दार ला. सौ अनिता बाळसराफ – शिक्षक राहुल लोंबर आणि बॅडमिंटनपटू चिरंजीव युवराज पारगे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल! माजी ला.अध्यक्ष दीपक बाळसराफ यांनी सर्व शिक्षक- पालक आणि संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानलेत! त्यानंतर लगेचच शिबिरातील प्रशिक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली!




