लायन्स क्लब ऑफ लोनावळा व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोनावळा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीराला प्रचंड प्रतिसाद




मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोनावळा व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोनावळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व लायन देवेंद्रकुमार माणिकचंद टाटिया याच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप,मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी लायन्स हॉल, विरंगुळा केंद्र येथे घेण्यात आले. या शिबीरांचे उद्घाटन श्रीमती पदमाबाई माणीकचंद्र टाटिया यांनी दिपप्रज्वलन करून केले. एच.व्ही. देसाई हॉस्पीटल पूणे येथून डॉक्टरची ची टीम आली होती. यावेळी २५० जनांची तपासनी १०० चष्मे वाटण्यात आले.व ३५ मोती बिंदूचे रुग्न होते त्यांची १८ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लायन पद्मा गुप्ता,लायन्स क्लबच्या अध्यक्षा तसेच सेक्रेटरी ला. नलिनी पवार खजिनदार , डॉ कवीता नैय्यर तसेच अखील भारतीय मारवाडी महिला संमेलन्नाचा अध्यक्षा संध्या सुनील खण्डेलवाल, सेक्रेटरी अमृता लुनावत, खजिनदार लता गुप्ता उपस्थीत होते. ला.साधना टाटिया , सुरज टाटिया,संचीता टाटीया यांनी संयोजन केले. ला. हिरालालजी खंडेलवाल, विजया खंडेलवाल, रवी वर्मा, झोन चेअरमन ला.शिव अग्रवाल, आनंद आगरवाल,ऍड प्रथमेश रजपूत, जेबी बक्षी, मोबशेर, संतोष अगरवाल, डॉ अमोल रानडे, जितेंद्र, सारीका सुराना, यश सोनवणे , प्रदीप गुप्ता, संजय गोळपकर, हे सर्व लायन्स पदाधिकारी उपस्थीत होते तसेच राजेंद्र टाटीया,पंकज टाटीया,डॉ निधी व आशा गदिया यांचे सहकार्य लाभले. संगीता भुरट, शशी अगरवाल, प्रज्ञा रजपूत,लायन डॉ ममता काळे यांनी देखील सहकार्य केलं.शस्त्रक्रिये साठी नेण्याची व आणण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. गेली ५ वर्षेपासून हे शिबीर घेत आहेत . विजया गुप्ता, आनंद महिला मंडल अध्यक्ष प्रभा गदिया, श्रावक संघाचे अध्यक्षा कांतीलाल ओस्तवाल, राजेश मेहता, जेष्ठ नागरिक संघांचे चे अध्यक्ष पांडुरंग तिखे,मृदुला पाटील , गोरख चौधरी, रशमी शिरस्कर, शारदा अगरवाल या सर्वांनी कार्यक्रमाला भेट दिली नेत्रदान, अंगदान, देहदान व स्कीनदान बद्दल ला साधना टाटीया यांनी मार्गदर्शन केले , साधना टाटीया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.




