लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांचा वाढदिवस निमित्त सेवानिवृत शिक्षकांची कृतज्ञता म्हणून सन्मान



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय आध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजीतदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गुरुपोर्णिमा व वाढदिवसांचे औचित्य साधून सेवानिवृत शिक्षकांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सत्कार समारंभाचे शहर अध्यक्ष श्री. विलास बडेकर यांनी आयोजन केले होते.या,प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतीक सदस्य नारायण पाळेकर,मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव टकले,माजी शहर अध्यक्ष जीवन गायकवाड,महिला अध्यक्षा उमा मेहता,माजी नगरसेविका आरोही तळेगांवकर,मुस्लीम सहकारी बँकेचे संचालक जाकीर खलीफा,आण्णाभाऊ साठे जंयती महोत्सव समितीचे अध्यक्ष नाना रोकडे,असंघटीत कामगार सेल अध्यक्ष तुषार सांवत,कष्टकरी सेल अध्यक्ष गणेश चव्हाण, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पवार,अशोक रोकडे,ओबीसी सेल अध्यक्ष समीर खोले,सचिव नरेश खोडंगे,सरचिटणीस मारुती राक्षे,शहर युवक उपाध्यक्ष गौरव गंभीर,मारुती दाभाडे,हरि चव्हाण,लहू आण्णा गायकवाड,प्रणव हुलावळे ,निहाल चव्हाण,पवन धारिया आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,शिक्षक गोरख चौधरी ,रक्ष्मी शिरस्कर,मंगल राणे,सुनिल पानगांवकर, पत्रकार प्रदिप वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला




