जेष्ठ समाज सेवक नंदकुमार वाळुंज यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवणे येथे डाक समुदाय विकास कार्यक्रमाचे भव्य आयोजन

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,”डाक चौपाल” डाक विभागाच्या विविध सेवांची पर्वणीच भारत सरकार, संचार मंत्रालय, डाक विभाग यांच्या मार्फत सप्टेंबर २०२४ पर्यंत संपूर्ण देशामध्ये ५००० गावांमध्ये डाक चौपाल अंतर्गत डाक समुदाय विकास प्रकल्प म्हणजेच गावांमध्ये डाक विभागाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय डाक विभाग व कोराईगड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने, सोनू अनाजी वाळुंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे येथे डाक समुदाय विकास कार्यक्रमाचे भव्य अयोजन दिनांक ३०.०७.२०२४ वार मंगळवार या दिवशी सकाळी १०:०० ते सायं ०५:०० या कालावधीत करण्यात आलेले आहे.डाक चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सहभागासाठी आवश्यक असलेले POSB खाते किंवा IPPB खाते (डिजिटल बँकिंग), आधार मोबाईल लिंकिंग, बाल आधार काढणे, टपाल जीवन विमा, सुकन्या समृध्दी योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, महिला सन्मान बचत पत्र, ज्येष्ठ नागरिक योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री जन सुरक्षा योजना, अपघाती विमा काढणे तसेच पेन्शन धारकांसाठी जीवन प्रमाण पत्र काढणे अशा विविध सेवांची माहिती व लाभ नागरिकांना एकाच दिवशी एकाच ठिकाणी लाभ घेता येईल.डाक चौपाल मध्ये देण्यात येणाऱ्या पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ आंबवणे व आसपासच्या गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून घ्यावा तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी श्री. रोहन देशमुख, शाखा डाकपाल आंबवणे किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करावा असे आवाहन अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग, पुणेचे बाळकृष्ण पो. एरंडे यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page