हुकुमशाहीचा अंत कसा होतो ? याचे ज्वलंत उदाहरणे अफगाणिस्तान,श्रीलंका,पाकिस्तान आणि आता शेजारील बांगलादेश



मावळ मराठा न्युज :- हुकुमशाहीचा अंत कसा होतो ? तर तो शेजारील बांग्लादेश याचे ज्वलंत उदाहरण. एकेकाळी देशाला लष्कराच्या हातात जाण्यापासून शेख हसीना यांनी वाचवलं होतं. पण नंतर त्याच हुकूमशाह असल्याप्रमाणे वागु लागल्या . विरोधकांना तुरुंगात डांबणं,यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ त्यांनी घातले.यावेळी शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. जुलै पासून ३०० हून अधिक तरुण मारले गेले. देशाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, आज आंदोलक हसीना यांच्या सरकारी घरात घुसले. तोडफोड करत आहेत.हसीना यांचे वडील मुजीबुर रेहमान ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचे योगदान विसरुन लोकांनी त्यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला त्याची विटंबना केली.शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, त्या देश सोडून पळाल्या.दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत सत्तेत असलेल्या राजपक्षे कुटुंबावर अशी वेळ आली होती, आज शेख हसीना यांच्यावर आली. लोकशाही मूल्यांची तुडवणूक करणाऱ्यांना एक दिवस भोगावं लागतंच हेच अफगाणिस्तान,श्रीलंका,पाकिस्तान,बांग्लादेश यांनी विसरू नये.




