लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन धडाकेबाज कारवाई,बेकायदेशीर दारु जवळ बाळगले प्रकरणी ५ ठिकाणी छापे,२१ लाख ७८ हजार किमतीचा माल जप्त

मावळ मराठा न्युज,लोणावळा:-पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख , अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, यांनी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर तसेच नाकाबंदी करुन अमली पदार्थ तसेच बेकायदेशीर दारु वाहतुक करणारांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री. सत्यसाई कार्तीक सो, सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीत अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यासाठी दुधीवरे खिंड, मळवली, वरसोली टोलनाका, टायगर पॉईंट, पवनानगर जबन फाटा इत्यादी ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट नेमून सर्व बीट ऑफिसर व अंमलदार यांना अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे दिनांक २५/०३/२०२४ रोजी होळी व धुलीवंदन सणाचे अनुषंगाने चार स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना पोलीस स्टेशन हद्दीत विवीध ठिकाणी नाकाबंदी लावून तसेच बीट हद्दीत चोरून अवैध व्यवसाय करणारांवर छापे मारण्याचे आदेश दिले होते.पथक क्र. १ – पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दुर्गा जाधव, पोलीस अंमलदार सुरज गायकवाड, होमगार्ड सागर दळवी, होमगार्ड सागर कुंभार यांचे पथकाने मळवली येथे नाकाबंदी लावून नाकाबंदी दरम्यान वाहनांची चेकींग सुरु केली. त्यादरम्यान हुंदाई क्रेटा कार नं. MH 04 LT २४२१ हीमध्ये विदेशी दारु, बीयर व गुन्ह्यात वापरलेली हुंदाई क्रेटा कार असा एकुण १५ ,१० ,८३० /- रुपयाचा माल पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांचे पथकाने जप्त केला. सदर कारमधील इसम १) शुभम शशिकांत दिपंकर वय २१ वर्षे रा. रुण्वाल इस्टेट ठाणे, मुंबई, २) वेदांत शरद चौधरी वय २१ वर्षे रा. मुकाई चौक किवळे पुणे, ३) प्रणव विजय साळुंखे वय २१ वर्षे रा. पनामा पार्क, लोहगड रोड पुणे, ४) मोहनीश शंकर मुदलियार वय २१ वर्षे रा. बेतल चर्च अंबराथ वेस्ट, ५) प्रणव अतुल विभुते वय २१ वर्षे रा. रस्टन कॉलनी चिंचवड पुणे यांचे विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या दारुची वाहतुक केले प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०२/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथक क्र. १ – पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांचे पथकाची नाकाबंदी सुरु असतानाच वाहनांचे चेकींग दरम्यान आणखी एक टाटा अल्ट्रॉज कार नं. MH 12 UW ०४४८ हीमध्ये विदेशी दारु, बीयर व गुन्ह्यात वापरलेली अल्ट्रॉज कार असा एकुण ६ ,५४ ,९६० /- रुपयाचा माल पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांचे पथकाने जप्त केला. सदर कारमधील इसम ।) वैभव चंद्रशेखर लुतडे वय ३० वर्षे रा. बाणेर पुणे, २) इशान विभव कदम वय २७ वर्षे रा. विमानगर पुणे यांचे विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या दारुची वाहतुक केले प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०३/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथक क्र. २ – सहा. पोलीस उपनिरीक्षक अजय दरेकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक पै. महेंद्र वाळुंजकर, महिला पोलीस नाईक रुपाली कोहीणकर यांचे पथकाने मोजे बोरज गावचे हद्दीत रेल्वे पटरीचे जवळ चोरून गावठी हातभट्टीची दारु विकणाऱ्या मिनीता राज बीरावत वय २२ वर्षे रा. बोरज ता. मावळ जि. पुणे या महिलेवर छापा कारवाई करुन तिचे ताब्यातून ९ ,३०० /- रुपये किमतीची ९० लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असुन प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०६/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथक क्र. ३ – पोलीस हवालदार जय पवार, पोलीस हवालदार विजय गाले, होमगार्ड उद्धव सानप, होमगार्ड भिमराव वाळुंज यांचे पथकाने मौजे शिळींब गावचे हद्दीत कातकरी वस्ती येथे चोरून गावठी हातभट्टीची दारु तयारर करण्यासाठीचे रसायन बनविणाऱ्या व गावठी हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या एकनाथ रामा घोगरे वय ४५ रा. शिळींब ता. मावळ जि. पुणे या इसमावर छापा कारवाई करुन त्याचे ताब्यातून कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारुन असा एकुण २ ,२०० /- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असुन प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०७/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथक क्र. ४ पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे, पोलीस अंमलदार सांडभोर, पोलीस अंमलदार कमठणकर, होमगार्ड शंकर खेंगरे यांचे पथकाने मौजे वाकसई गावचे हद्दीत खडी मशीन जवळ चोरून गावठी हातभट्टीची दारु विकणाऱ्या रेखा ऋषी बीरावत वय ४० वर्षे रा. डोंगरगाव ता. मावळ जि. पुणे या महिलेवर छापा कारवाई करुन तिचे ताब्यातून १५०० /- रुपये किमतीची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त केली असुन त्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०९/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईमध्ये लोणावळा ग्रामीण पोलीसांनी एकूण २१ ,७८ ,७९० /- रुपये किमतीचा माल जप्त जप्त केला असुन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर चुमाळ यांचेसह कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण व सहा. पोलीस अधीक्षक सो लोणावळा विभाग यांनी अभिनंदन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page