लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईने मोठी घरपोडी चोरी उघड,आरोपी जेरबंद

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक ९/३/२०२५ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट या व्यापाऱ्याचे दुकान फोडून ८ ,७८ ,००० रु.ची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता त्या अज्ञात इसमाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पो स्टेशन गु. रजि.नंबर ६९/२०२५ BNS 305(A), 331(4) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीसांनी कौशल्यपूर्वक तपास व सयुक्त कारवाई करून आरोपीचा शोध लावून त्यास जेरबंद केल. आरोपीस ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याने ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादाने चोरी केल्याचे खबुली केले आहे सदर गुन्हयांचे अनुशंगाने तपास स्थानिक गुन्हे शाखा, व लोणावळा ग्रामीण ग्रामीण हे करीत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर आरोपी हा लातुर येथील बाभळगाव शेलु येथे राहत असलेबाबत समजल्याने मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे परवानगीने लातुर जिल्ह्यातील बाभळगाव येथे आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन मोहन बोयणे वय ३२ वर्षे रा. सध्या रा. वराळे फाटा तळेगाव दाभाडे ता. मावळ जि पुणे मुळ रा. सेलू ता.जि. लातूर असे सांगितले व त्यास विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केला असलेबाबत सांगितले असुन सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन तशी नोंद लातूर ग्रामीण पोलिस ठाणे येथे करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकामी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख सो, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे सो, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सो , किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पो स्टे यांचे मार्गदर्शनाखालीपो.उपनि अभिजीत सावंत,पो उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे लोणावळा ग्रामीण पोस्टे.पो हवा राहुल पवार,पो हवा राजु मोमिन,पो हवा अतुल डेरे,पो हवा मंगेश थिगळे, पो हवा सागर नामदास,पो हवा तुषार भोईटेपो.कॉ मंगेश भगत सर्व स्थानिक गुन्हे शाखापो हवा विजय गाळे लो ग्रापो ना सतिश कुदळे लो ग्रा यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सहभाग घेतला होता.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत आहेत

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page