पुणे येथील जेष्ठसमाजसेवक आणि उद्योजक रमणलाल लुंकड यांच्यासह पाच जणांना लोकसभाअध्यक्ष ओम बिरला यांचे हस्ते ” जैन समाज रत्न ” पुरस्कार

मावळ मराठा न्युज :-मुंबई,मुंबई येथे १२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारत जैन महामंडळाच्या वतीने रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी विश्व मैत्री दिवस व सामुदायिक क्षमापना अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हा कार्यक्रम मुंबई सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी आचार्य पू, श्री, मतिचंद्रसागर सुरीश्वरजी म, सा, आचार्य पू, श्री, विजयप्रभाकर सुरीश्वरजी म, सा, राष्ट्रसंत पू, श्री, नम्रमुनिजी म, सा, क्रांतिकारी संत मुनिश्री १०८ पू, श्री, प्रणुतसागरजी म, सा, मुनि १०८ पू, श्री, जयन्द्रसागरजी म, सा, महा साध्वी पू, श्री, मंगलप्रज्ञाजी म, सा, आदी ठाणा असे चारही संप्रदायाचे साधु-साध्वीगण उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील लोकसभेचे अध्यक्ष मा, श्री, ओमजी बिड़ला, कौशल्य रोजगार विकास कॅबिनेट मंत्री मा, श्री, मंगलप्रभातजी लोढा, राज्यसभेचे सदस्य श्री, मिलिंदजी देवरा, राज्यसभेचे सदस्य श्री, राहुलजी शेवाळे, प्रसिध्द बांधकाम उद्योजक व दानशूर श्री, सुभाषजी रुणवाळ, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री, सी, सी, डांगी, श्री, सुमतिलालजी कर्नावट, श्री, राकेशजी जैन, श्री, के, सी, जैन , सौ, चंदाजी रुणवाळ, सौ, राजकुमारी बोरा, सौ, लताजी डांगी, श्री, नरेंद्रजी हिरावत, श्री, माणकलालजी शाह तसेच श्री, ओमजी बिड़ला यांची कन्या अंजली बिड़ला आदी मान्यवर स्टेजवर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात कोकीळ कंठी, युवा गायिका अभिलाषा बाठीया यांनी नवकार मंत्र है महामंत्र, इस मंत्र की महिमा भारी है, या मंत्राणे करुन दिली, त्यानंतर मैत्री भाववर मैत्रिका पर्व यह महान है, हे गीत मधूर आवाजात सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर या कार्यक्रमाचे गौतम प्रसादीचे लाभार्थी श्री, माणकलालजी मुळचंदजी शाह यांनी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले, नंतर सर्व साधु संतांनी मिच्छामि दुक्कडम चे महत्व सांगून येणाऱ्या तरूण पीढीला योग्य संस्कार दिले पाहिजे नाहीतर या तरूण पीढीला जैन धर्म म्हणजे काय हे समजणार नाही, व आपण सांप्रदायिक वाद न करीता आपण फक्त जैन आह़ोत हे समजले पाहिजे, या विषयावर प्रबोधन केले, यानंतर भारत जैन महामंडळाच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणारे पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाज भूषण, दानशूर, भामाशाह श्री, रमणलालजी लुंकड यांना जैन समाज रत्न हा पुरस्कार लोकसभेचे अध्यक्ष श्री, ओमजी बिड़ला यांच्या शुभहस्ते व मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए सी, सी, डांगी, उद्योगपती सुभाषजी रुणवाळ, राकेशजी जैन यांच्या उपस्थितीत प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला, त्यानंतर मुंबई येथील उद्योजक प्रशांतजी जैन, नेपाळ मधील वीरारनगर येथील उद्योजक किसनलालजी दुगड, चेन्नई येथील उद्योजक रमेशजी मुथा व राजस्थान मधील जोधपूर येथील ८४ वर्षाच्या सेवाभावी, उद्योजिका श्रीमती सुशीलादेवी बोरा यांना सौ, चंदाजी रुणवाळ, राजकुमारी बोरा, लताजी डांगी समवेत ओमजी बिड़ला यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच यानंतर पर्यावरण मध्ये काम करणारे श्री, शशिकिरणजी जैन व राजस्थान मधील प्रकाशित होणारे शताब्दी गौरव या समाचार पत्राचे संपादक श्री, सिध्दराजजी लोढा यांचा विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या भारदस्त आवाजात बाबुलालजी बाफना यांनी केले, तर सर्व पुरस्कार्थींचे व प्रमुख पाहुण्यांचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष सी, सी, डांगी यांचा परिचय सर्वांचे लक्ष वेधून फिल्मी स्टाईलने सिमरन आहुजा यांनी केले, त्यानंतर भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री, सीए सी, सी, डांगी ‌यांनी प्रास्ताविक भाषण केले, यामध्ये १२५ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या संस्थेची माहिती त्यांनी थोडक्यात दिली, व चारही संप्रदायाचे सर्व आचार्य व साधुसंतांनी संवत्सरी महापर्व हे सर्वांनी तिथीनुसार एकाच दिवशी साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले,यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून शेवटी लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिडला यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनी भगवान महावीरांनी दिलेला संदेश आचरणात आणला पाहिजे, या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व उद्योजक, व्यावसायिक व कार्यकर्ते उपस्थित होते,‌ सभागृह गच्च भरून अनेक बांधव आजूबाजूला उभे होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page