लोणावळा नगरपरिषद शाळांतील विदयार्थी बनले मुर्तीकार,कार्यशाळेत १६० विदयार्थी व शिक्षक यांची उपस्थिती
मावळ मराठा न्युज – लोणावळा,स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुधंरा ५ .० अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने नगरपरिषदेच्या सर्व १३ शाळेमधील ५ वी ते १० वी पर्यंतच्या विदयार्थ्याची पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यशाळा दि.२/९/२०२४ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत आयेाजीत केलेली होती. या कार्यशाळेत एकूण १६० विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रथमतः या कार्यशाळेचे प्रस्ताविक लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विदयालय खंडाळा येथील मुख्याध्यापक श्री.राजेंद्र दिवेकर सर यांनी केले. त्यानंतर सर्व विदयार्थ्याना शाडू मुर्ती व विविध साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व विदयार्थ्याना टप्याटप्याने शाडू माती पासून पर्यावरणपूरक गणेश मुर्ती बनविणेकरीता श्री.राजेंद्र दिवेकर सर यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याप्रमाणे सर्व विदयार्थ्यानी गणेश मुर्ती तयार केल्या. त्यानंतर लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.शरद कुलकर्णी यांनी झाडाचे रोप व प्रशस्तीपत्रक देवून श्री.राजेंद्र दिवेकर सरांचे स्वागत केले. त्यांचे समवेत सरांची कन्या कुमारी.खुशी दिवेकर या कार्यशाळेत सहभागी होत्या. या प्रसंगी नगरपरिषदेचे अभियंता यशवंत मुंडे, सिटी को ऑर्डीनेटर विवेक फडतरे, सहा.ग्रंथपाल विजय लोणकर, निसार शेख,खंडू बोभाटे, साधना मोरमारे, निलेश सोनावणे, गौतम गायकवाड, प्राथमिक शाळांचे शिक्षक श्री.पारधी,श्री. साबळे, श्री.जगताप, सौ.दरेकर, सौ.जोशी, सौ.अहिरे,सौ.पवार व माध्यमिक शाळांचे शिक्षक श्री.पठाण सर उपस्थित होते. सर्व विदयार्थ्यानी गणेशमुर्ती तयार केलेनंतर सर्वा बरोबर सेल्फी घेण्यात आली. तसेच सर्व सण हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करणेकरीता सर्वानी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली.