अनुभवात्मक शिक्षण व्यवसाय ज्ञान आणि खेळांचा आनंद घेत लोणावळा महाविद्यालयात फन फेअर संपन्न








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्योजकता आणि टीमवर्क विकसित करण्याच्या उद्देशाने वाणिज्य विभागामार्फत आयोजित ‘फन फेअर’ उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा उपक्रम दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.यावेळी फन फेअर मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारच्या चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारून व्यवसायिक ज्ञान अनुभवातून घेतले तसेच मनोरंजनात्मक आणि कौशल्यवर्धक खेळांचे आयोजन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्य संपादक श्री.ऍड.संजय राजाराम पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून फनफेअर चे उदघाटन करण्यात आले. प्राचार्यांनी उद्घाटनपर भाषणात सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून उपक्रमास शुभेछा दिल्या. माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष विशाल विकारी, लोणावळा शहरातील अनेक नागरिक व आजी-माजी विद्यार्थी व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच खेळांचा आनंद घेतला.अनुभवात्मक शिक्षण (Experiential learning )या तत्वावर आधारित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन, व्यवस्थापन कौशल्य आणि संघभावना यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह द्विगुणित झाला याबद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, सहसचिव ऍडव्होकेट अजय भोईर, विश्वस्त श्री. विशाल पाडाळे, सदस्य ऍडव्होकेट इंदुकुमार भोंडे यांनी प्राचार्य डॉ. देशमुख व विभागप्रमुख डॉ. धनश्री पाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांचे यांचे अभिनंदन केले.अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण होऊन त्यांना भविष्याकरिता प्रेरणा मिळावी हा प्रमुख हेतू असल्याचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. धनश्री मध्ये यांनी सांगितले तसेच वाणिज्य विभागातील सर्व सहकाऱ्यांचे सदर उपक्रम यशस्वी पार पडण्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विलास पाटील, परिक्षा विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, IQAC समन्वयक डॉ. अमर काटकर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ऍनी वर्गीस, सर्व विभाग प्रमुख, उपस्थित होते.



