उद्या २५ फेब्रुवारीला लोणावळा महाविद्यालयात परिसरातील तरुण तरुणीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

मावळ मराठा न्युज- लोणावळा, रोटरी क्लब ऑफ लोणावळा व वलवण कॉलेज GOYN आणि मधुश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा लोणावळा महाविद्यालयात २५ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी आयोजित केला.रोटरी क्लब,लोणावळा महाविद्यालय आणि मधुश्री फौंडेशन यांच्या वतीने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जॉब ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. आपल्या करिअरसाठी उत्तम संधी शोधण्याची आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम सुवर्णसंधी आहे.१०+ हून अधिक नामांकित कंपन्या विविध क्षेत्रांमधून सहभागी होत आहेत.🔹 *लॉजिस्टिक्स*🔹 सपोर्ट सर्व्हिसेस🔹 बॅक ऑफिस आणि BPO🔹 BFSIयांसर्व जागासाठी सर्व उमेदवारांनी दिनांक: २५ फेब्रुवारी २०२५, सकाळी ९वाजता डॉ बी .एन पुरंदरे कॉलेज येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकडून करण्यात आले आहे. यात पगार श्रेणी: ₹१५,००० – ₹२५,००० प्रति महिना असणार आहे.सर्व विद्यार्थ्यांनी बेरोजगार तरुण तरुणीनींनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा. यासाठी पूर्ण तयारीसह यात शैक्षणिक प्रमाण पत्रासह बायोडाटा ओळखपत्र घेऊन उपस्थित राहण्याचे रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष नारायण शारवाले यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना सांगितले.खालील लिंक वर क्लिक करून आपले नावनोंदणी करावी👇61iH6HwE6UFo1DVFd8https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZcS3kTaHyGgpl61iH6HwE6UFo1DVFd8umVOdZyKhZ9SAT9w/viewform? सदर कार्यक्रम हा वलवन कॉलेज येथे होणार आहे. तरी सर्व गरजू तरुण तरुणीनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष शारवाले यांनी केले आहे..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page