खंडाळा येथे शिवजयंती विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरी







मावळ मराठा न्युज – खंडाळा,सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सवाची सुरुवात संत गाडगे महाराज विद्यालय प्राथमिक शाळा क्रमांक १० व लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे विविध स्पर्धेद्वारे सुरुवात करण्यात आली मुख्याध्यापक कैलास वाघमारे, सूर्यकांत खरात, जालिंदर जाधव,रत्नेश्वर भुरे सुचिता एके सुनिता धुमाळ अभंग आगलावे तसेच माध्यमिक विभागातर्फे. देवराम नथू पारिथे सर ज्ञानदेव बोरसे यांनी पाहिले.. पवनानगर येथून संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक नारायण भालेराव शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश गुप्ता सरपंच संजय मोहाळ यांच्या हस्ते पूजन करून शिवज्योत किल्ले तिकोना ते लोणावळा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा मार्गे खंडाळा असे नियोजन करण्यात आले होते ज्योत चे आगमन होताच खंडाळा येथे उत्सव मंडळाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर नंतर सायंकाळी ठीक सात वाजता लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या हस्ते तसेच सय्यद पोलीस निरीक्षक सन्माननीय लाड नगरसेवक जीवन गायकवाड, भाग्यश्री जगताप, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती सनी दळवी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद जी गायकवाड, जैन पंचायतचे दीपक रतनचंद काळे, माजी नगरसेविका पुजाताई गायकवाड ,सौ नेहा गायकवाड , सौ.उर्मिला पवार सागरमल जैन, शामराव पवार, धनंजय जांभुळकर,नरेंद्र कचरे , अशोक गव्हर्नमेंट सुधीर मोहिते, राजू जाधव अशोक मानकर सुरेश गायकवाड डॉक्टर चंपक जैन पंकज काले दिलीप ओसवाल सनी जैन ऋषभ ओसवाल शशिकांत गायके मंगेश येवले महेश येवले विनोद खराडे श्याम खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याच्या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला… लक्षणीय ठरलेल्या मिरवणुकीत डोली जिम पारंपारिक बँड वाद्य डीजे विद्युत रोषणाई द्वारे आकर्षित ठरलेल्या रथ व मंडळाच्या कार्यकर्त्या पदाधिकारी खंडाळा ग्रामस्थ महिला यांची उपस्थिती लक्षणीय होती.. दिनांक शनिवार सात मार्च रोजी सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू व तरुण मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. या गावातील तरुण स्पर्धकांनी व महिलांचा सहभाग अधिक होता. या कार्यक्रमादरम्यान लोहा नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे व बांधकाम समितीचे सभापती सनी दळवी यांनी भेट दिली.महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व अल्पहार देण्यात आला.. दिनांक ९ मार्च सोमवार रोजी सकाळी दहा वाजता लोणावळा नगरीचे उपनगराध्यक्ष देविदासजी कडू यांच्या शुभहस्ते मंडळ व पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर याचे उद्घाटन करण्यात आले.. यामध्ये नागरिकांचा व रक्तदात्यांचा सहभाग उत्साह वाढविणारा होता. हृदयविकार तपासणी मूत्रविकार तपासणी हाडांची तपासणी रक्त व मधुमेह तपासणी त्वचारोग तपासणी पोट छाती तपासणी व मोफत औषधांचे वाटप करण्यात येऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले पवना हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर सत्यजित उर्फ दादा वाढव कर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प ऑर्गनायझर लेझी मेनन, अमित आवटे, डॉक्टर संकेत निर्बंध,डॉक्टर प्रेरणा, डॉक्टर अर्मदा, नर्स दमयंती, विजय चौरे,दर्शन काळे संकेत काळे,आणि इतर स्टाफ ने आरोग्य शिबिराचे काम पाहिले.तसेच रक्तदान शिबिरा करिता डॉक्टर दीपक पाटील यांच्याबरोबर सिस्टर आनंदी भोसले . टेक्निशन अमोल जानगुडे,नेहा लांडगे , टेक्निशियन प्रीती, आणि आकाश यांनी काम पाहिले याप्रसंगी डॉक्टर चंपक जैन डॉक्टर सुमित सोलंकी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता दळवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोकजी मावकर, गोपीचंद सोनवणे,राजेंद्र मोहिते, दुर्गा भाभी,हरिभाऊ देवडा, श्रीमती लीलामती, जगदीश देवडा भाभी, नगरसेवक सुभाष डेनकर यांनी भेट देऊन रक्तदान केले. सोमवार दिनांक ९ मार्च रोजी खंडाळा रेल्वे स्टेशन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. रेल्वे स्टेशनच्या वतीने सहाय्यक स्टेशन प्रबंधक उपेंद्र शर्मा,अशोक टाक तसेच संतोष गोणते, दिनेश, तन्मय दिघे, आबा पाटील, शशिकांत गायके, मंगेश येवले, दिनेश वीर, सदानंद पिलाने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.वृक्षारोपणाने शिवजयंती उत्सव मित्र मंडळाच्या शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. या सर्व नियोजित कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विश्वस्त सरचिटणीस मच्छिंद्र बबनराव खराडे, दीपक मसुरकर, भालचंद्र खराडे, माजी नगरसेवक खंडाळा मत प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती तारामती शिर्के,संजय कदम,अनंता दळवी,राजेश उर्फ भाऊ सपकाळ,प्रसाद शिर्के,सचिन वाळके, संतोष वाळके, प्रकाश पवार,धनंजय सपकाळ,नितीन सोनवणे,शेखर चव्हाण,संजय परदेशी, निलेश सुतार,ओमकार खराडे उत्सव कार्यकारी अध्यक्ष किशोर वाघमारे , रोहित पांढरे चिराग खराडे, गणेश पांढरे, भावेश खराडे, चैतन्य खराडे, कार्तिक घाडगे, तेजस खराडे, बाबू पवार,मयूर पवार,राजेश महाडिक, निशांत शिरसागर, प्रतीक खराडे ,शुभम बनसोडे, पंकज पवार, आकाश सोनवणे, स्वप्निल सपकाळ, यश सोनवणे, पार्थ महाडिक, नितेश पवार, विघ्नेश सपकाळ, विघ्नेश कुठे, किसन सोने भावार्थ पवार, सुदर्शन पवार,शार्दुल पवार, रुद्रा आडीलकर,आर्यन मांडवकर, सोहम महाडिक, कौस्तुभ कोळसकर,आदित्य पाताडे,सौरभ शिंदे,विराज जाधव,शिवम जांभुळकर,दादू राठोड,रोहित चव्हाण,स्मित पालवे,रोहित गुरव,अथर्व सपकाळ,साई सपकाळ,यश पवार,ओम ढोबळे,पंकज पवार यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.



