चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पुणे बुक फेस्टिव्हल २०२४ चे तोंडभरून कौतुक



मावळ मराठा न्युज – पुणे -महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे बुक फेस्टिव्हल २०२४ भेट देऊन”वाचन संस्कृती तळागाळापर्यंत पोचली पाहिजे आणि वाढली पाहिजे, आणि पुणे पुस्तक महोत्सव हे ध्येय पूर्ण करत आहे,” असे सांगून त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच राज्यातील खेड्यापाड्यात असे उत्सव आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीबद्दल आयोजक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अवघ्या तीन दिवसांत, पुणे बुक फेस्टिव्हल २०२४ ला ३ .५ लाखांहून अधिक अभ्यागतांनी अप्रतिम गर्दी केली यातच आयोजकांचे यश आणि उद्देश सफल झाल्याचे दिसून येते. या उल्लेखनीय उपस्थीतीने पुणेकरांचा पुस्तकांवरील उत्साह आणि प्रेमाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. असा उदंड प्रतिसाद शहराची चैतन्यशील संस्कृती आणि वाचनाची अतूट आवड दाखवतो.




