स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार”भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या शुभ हस्ते प्रदान




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाचा “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार” भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या शुभ हस्ते आज बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. बी.एन. गंगाधर (Chairman National Medical Commission, New Delhi)डॉ. राजीव कुमार (Chancellor Gokhale Institute of Economics & Politics Former Vice Chairman, NITI Aayog, New दिल्ली)आणि डॉ. संप्रसाद विनोद (Renowned Yoga Expet & Resarcher, पुणे)या तीन मान्यवरांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रीय गीत आणि शांती पाठाने करण्यात आली. यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती सन्मानीय श्री रामनाथ कोविन्द यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम शताब्दी वर्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सन्मानीय श्री सुरेश प्रभू, कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, डॉ. रणजीत सिंग भोगल, पुरस्कार्थी डॉ.बी.एन. गंगाधर, डॉ. राजीव कुमार आणि डॉ. संप्रसाद विनोद यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुसज्ज पोलीस यंत्रणा राबविण्यात आली होती.श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि श्री सुरेश प्रभू यांनी प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती सन्मानीय श्री रामनाथ कोविन्द यांचा शाल, कैवल्यधाम संस्थेची शताब्दी वर्षाची मुद्रा आणि योग विषयक पुस्तके देऊन सन्मानित केले.यानंतर तीन पुरस्कार्थी यांचा संक्षिप्त स्वरुपात परिचय देऊन त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती सन्मानीय श्री रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार (कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद जी यांची मूर्ती, कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा तसेच प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षात राबविलेल्या गेलेल्या प्रमुख कार्यक्रमांची रूपरेखा चित्रफिती दवारे दाखविण्यात आली.यानंतर श्री सुरेश प्रभू यांचे भाषण झाले आणि शेवटी सन्मानीय रामनाथ कोविन्द यांनी उपस्थितांना संबोधित केले. आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्र संचालन योग महाविद्यालयातील शिक्षिका ममता बिष्ट यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. रणजीत सिंग भोगल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्र आणि राष्ट्रीय गीताने करण्यात आली.श्री रामनाथ कोविन्द १६ ते १७ सप्टेंबर पर्यंत कैवल्यधाम संस्थेत वास्तव्यास होते या दरम्यान त्यांनी कैवल्यधाम संस्थेच्या संदिपानी लायब्ररी, कैवल्यधाम ऐतिहासिक संग्रालय, शास्त्रीय अनुसंधान विभाग, कैवल्य विद्या निकेतन शाळा इत्यादी विभागास भेटी दिल्या व त्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि योगाभ्यासाचा अनुभव घेतला तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामी कुवलयानंद जी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी केले होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कैवल्यधाम संस्थेचा कर्मचारी वर्ग आणि योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पोलीस यंत्रणा यांनी विशेष परिश्रम घेतले.




