दि.पेण को. ऑप अर्बन बँक ठेविदार खातेदार यांचे ३० सप्टेंबर पासून विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण

मावळ मराठा न्युज :-कर्जत,पेण को. ऑप अर्बन बैंक बंद होऊन १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी अजून पर्यंत ठेविदार म्हणजे खातेदार यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीचे रमेश शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. लोकमान्य टिळक चौक, कर्जत येथे ठिय्या आंदोलन व दिनांक ३ ऑक्टोंबर,२०२४ पासून साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत करणार आहेत. मुख्य मागण्या यात १) पेण अर्बन बैंक १,५८,२८० ठेविदारांना ६ टक्के व्याजाने संपूर्ण ठेवी देण्यात याव्यात.२) नवीन कायदयाच्या तरतुदीनुसार सर्व ठेविदारांना ५ लाखाचा विमा तात्काळ देण्यात यावा. ३) ५ लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्या ठेविदारांना बँकेत जमा असलेल्या रकमेतुन व बँकेची मालमत्ता विक्री करुन येणाऱ्या रकमेतून सर्व ठेविदारांच्या ठेवी परत देण्यात याव्यात.४) पेण अर्बन बँकेच्या जमीनीचा विक्री व लिलाव ठेविदाराच्या सम्मती शिवाय करण्यात येऊ नये.५) मा. उच्च न्यायालयाचे पेण अर्बन बँकेचे लायसन्स रद्द न करण्याचे स्पष्ट आदेश असून सुध्दा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर R.B.I. ने बँकेचे लायसन रद्द केले हे अत्यंत चुकीचे आहे व मा. उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे पेण अर्बन बँकेचे रद्द केलेले लायसन पुन्हा सुरु करण्यात यावे.६) दि. ९ फेब्रुवारी, २०१२ रोजी बँकेचे लायसन रद्द झालेले असताना D.I.C.G.C. ने २०१३ व २०१४ रोजीचे विम्याचे हप्ते स्विकारले आहेत, त्यानंतरचे हप्ते लायसन रद्द असल्याचे कारण पुढे करुन स्विकारले नाहीत. लायसन रद्द असताना २०१३ व २०१४ रोजीचे हप्ते D.I.C.G.C. स्विकारले त्याप्रमाणे २०२४ पर्यतचे हप्ते D.I.C.G.C. स्विकारावे.७) R.B.I. ऑडिटर बरी खान यांनी सलग २००२ ते २००९ पर्यंत लाच घेऊन बँकेचा ऑडिट रिपोर्ट चुकीचा म्हणजे A+ देऊन ठेवीदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे ठेविदाराचे पैसे त्वरीत परत करण्यात यावे. यासाठी रमेश शांताराम कदम,श्रीमती सिध्दी पुराणीक,श्रीमती सुलभा ताई लोंढे,मेघा ताई राणे,गणेश काळे,मोहन रघुनाथ सुर्वे,प्रदिप केशवलाल शहा आदी पेण अर्बन बँकेचे ठेवीदार खातेदार आंदोलन करणार आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page