भरत नागरी सहकारी पतसंस्थेच्या भरत सहकार पॅनल चे घवघवीत यश


मावळ मराठा न्यूज,लोणावळा,लोणावळ्यातील स्वर्गीय भरत आगरवाल सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या निवडणुकीत भरत सहकार पॅनेलने विरोधी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवून सर्वच्या सर्व ९ जागा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.सभासदांनी पुन्हा भरत सहकार पॅनेलच्या हातात कारभाराची सूत्रे दिली आहेत. स्वर्गीय भरत अगरवाल यांनी स्थापन केलेल्या या पतसंस्थेचा कारभार लता भरत अगरवाल ,जुने जाणते अरविंद कुलकर्णी आदी नी संस्थेची धुरा यशस्वी पणे सांभाळली आणि संस्थेचा प्रगतीचा आलेख वाढता च ठेवला आहे त्यामुळेच सभासदांनी पुन्हा सत्ता त्यांचे कडे सोपवली आहे. भरत सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते१) श्रीमती लता भरत आगरवाल (११०३)२) अरविंद कुलकर्णी (९९४)३) यशवंत उर्फ बाळासाहेब पायगुडे (९४७)४) रामविलास खंडेलवाल (९४४)५) राजू दळवी (९४२)६) मिलिंद उर्फ राजाभाऊ खळदकर (९१४)७) सुरेश गायकवाड (९१३)८) संजय गायकवाड (९०९)९) सुनंदा दाभणे (९०७)१०) ऋषिकेश लेंडघर (बिनविरोध)११) दत्तात्रय तांदळे (बिनविरोध)परिवर्तन पॅनेलचे पराभूत उमेदवार आणि त्यांना पडलेली मते१) नितीन सोनवणे (४२५)२) धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी (३८९)३) राजेंद्र चौहान (३८०)४) अरुण जोशी (ए.के.जोशी) (३७८)५) श्रिया रहाळकर (३२५)




