तळेगाव पोलीस ठाण्यातील हवालदाराला पाच हजारांची लाच घेताना अटक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई

मावळ मराठा न्युज  –तळेगाव, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत मंत्रा सिटी रोडवर एका बियर शॉपीत काही वेळापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून एका हवालदाराला पाच हजारांची लाच घेताना पकडले.याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश अरुण जाधव (वय ४२) यांच्याविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेथोडक्यात हकीकत अशी की तक्रारदार हे बिअर शॉपी चालवत असून, त्यांच्या दोन बिअर शॉपी आहेत. पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे सदर बिअर शॉपी व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी प्रत्येक बिअर शॉपीचे ६,०००/- प्रमाणे दोन बिअर शॉपीचे एकुण १२,०००/- रुपयाची लाचेची मागणी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक यांचेसाठी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येथे दिली होती.सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील कामासाठी तडजोडीअंती ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, ५,०००/- (पाच हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. सतीश जाधव याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांक यावर सपंर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.यासंदर्भात नुकतेच पुणे जिल्ह्यातील जसवळपास सर्वच तालुक्यात ॲन्टी करप्शन ब्यूरो,पुणे यांच्या वतीने जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे यांनी लोणावळ्यात देखील पत्रकार परिषद घेतली होती.१) ॲन्टी करप्शन ब्यूरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३२) व्हॉट्सॲप क्रमांक मुंबई ९९३०९९७७०० ३) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in५) ऑनलाईन ॲप तक्रार www.acbmaharashtra.net.in

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page