संपर्क संस्थेच्या वैद्यकीय विभागा मार्फत दरवर्षी ३७००० हून अधिक रुग्णांना दिली जाते वैद्यकीय सेवा



मावळ मराठा न्युज :-भाजे,संपर्क संस्थेच्या मळवली येथील संपर्क वैद्यकीय विभाग सामुदायिक आरोग्य सेवा जणू नवे मानदंड स्थापित करीत आहे.संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात २०२३ -२४ या वर्षात बाह्यरुग्ण विभाग , अंतररुग्ण विभाग , दंत चिकित्सा नेत्र विभाग , पॅथॉलॉजी , स्त्रीरोग , लहान शस्त्रक्रिया व दोन वैद्यकीय मोबाइल व्हॅन या द्वारे या केंद्राने ३७ ,७३५ रुग्णापर्यंत आपल्यां सेवा पोहचवल्या आहेत विशेष करून यात कातकरी वस्त्यांमधील नागरिकांचा अधिक समावेश आहे मावळ तालुक्यातील खेड्या पाडय़ात मोबाईल व्हॅन तेथील रहिवाश्यांना आरोग्य सेवा सातत्याने पुरवीत आहे संपर्क वैद्यकीय विभागाने २८ मे रोजी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ११ गावांमध्ये जणजाग्रुति मोहीम राबविली मुलींना स्वच्छता व खबरदारी बद्दल शिक्षित केले या मोहिमेत तेथील आशा सेविकानी महत्वाची भूमिका बजावली ११ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली रुग्णांना मोफत चष्मे मोफत औषधे दिली गेली तसेच मोफत शस्त्रक्रियेसाठी नियोजन करून दिले गर्भवती महिलांची रक्त तपासणी डासांशी संबंधित आजाराची तपासणी करण्यात आली असे अनेक आरोग्यविषयक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक आरोग्य विषयी मोहिमेत संपर्क आरोग्य विभाग उत्साहाने सहभाग घेत असून याबाबत जनजागरुती करत आहे संपर्क संस्था गेली 33 वर्षे शिक्षण बाल कल्याण , व्यावसायिक प्रशिक्षण महिला सक्षमीकरण , दुर्बल घटकांना मदत करण्याचे काम करते वैद्यकीय सेवेत ही ग्रामीण भागात सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करत आहे.”संपर्क संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॅनर्जी म्हणाले ” संपर्क वैद्यकीय विभाग एक आरोग्य सेवा केंद्र नसून हे आशेचे व धैर्याचे प्रतीक आहे सर्वांसाठी निरोगी भविष्याचा पाठपुरावा करत असताना कोणत्याही घटकाला मागे सोडले जाणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आणि आमच्या प्रयत्नांना सुरू ठेवण्यासाठी आम्ही सदैव वचनबद्ध आहोत “




