श्री एकवीरा देवस्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च

मावळ मराठा न्यूज,लोणावळा,महाराष्ट्राचे जागृत देवस्थान व ठाकरे कुटुंबाची,आगरी बांधव आणि सर्वांची श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट ची निवडणूक होत आहे.स्वर्गीय अनंत तरे यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून एकवीरा देवीची सेवा केली. सात ते आठ वर्षापासून विश्वस्त यांचेतील वाद हा पराकोटीला गेल्याने मोठा प्रश्न निर्माण झाल्याने २०१५- २०१६ पासून प्रशासकीय कारभार येथे सुरू होता,यात काही काळ वडगाव कोर्ट, तहसीलदार,हा कारभार पाहत होती.मात्र आता २६ फेब्रुवारीला ही ७ विश्वस्त यांची निवडणूक होत आहे यात ३ सदस्यांची निवड ही बिन विरोध झाल्याने ४ विश्वस्त साठी २७ उमेदवार रिंगणात असल्याने या महत्वपूर्ण आणि नामांकित देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ऍक्शन मोड मध्ये आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सदर देवस्थान हे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने आज रोजी मौजे वेहेरगाव येथे श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूक अनुषंगाने रॅपिड अकॅशन फोर्स व पो स्टे अधिकारी व स्टाफ यांचा रूट मार्च घेण्यात आला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page