ज्येष्ठ नागरिक संघ,लोणावळा आणि डॉ प्रवीण बढे यांच्या परिस्टाईन आयुर फॉउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा,डॉक्टर प्रवीण बढे,प्रिस्टाईन आयुर इंडिया,चैरिटी फाउंडेशन, जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साहाय्याने आरोग्य तपासणी शिबीर ७ मे रोजी लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात संपन्न उद्योगरत्न आयुर्वेद तज्ज्ञ डॉ प्रवीण बढे यांच्या परिस्टाईन आयुर फॉउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नाडी परीक्षक सचिन पवार, आरोग्य सल्लागार कल्याण जगदाळे,आरोग्य सल्लागार भूषण पंचवा डकर, प्राणिक हीलर व आरोग्य सल्लागार यांनी शिबिरात लोकांची जर्मण टेक्नॉलॉजी मशीन च्या सहायने संपूर्ण शरीराची चाचणी करण्यात आली व त्यावर सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधे ही देण्यात आली.यामध्ये शरीरातील ३८ आजारांची चाचणी करण्यात आली या शिबिराचे उदघाटन लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी रिबन कापून केले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ टीमचा सन्मान करण्यात आला . प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघांचे तालुका समन्वयक डॉ नामदेव डफळ, संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, गोरख चौधरी रवी कुलकर्णी रश्मी सिरस्कर, मृदुला पाटील, सुनील पंगावकर, आदिसह इतर पदाधिकारी सदस्य उपस्तिथ होते. सदर डॉक्टर यांच्या टीम ला आपल्या पर्यंत घेऊन येणारे श्री आप्पा कुलकर्णी यांना विशेष धन्यवाद. १०१ लोकांनी यां शिबिराचा लाभ घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page