*जाई वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने नंदकुमार वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींना जॅकीटचे मोफत वितरण*





मावळ मराठा न्यूज-आंबवणे- मुळशी, तालुक्यातील आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयातील सर्वच विद्यार्थिनीना गणवेशावरील जॅकीट चे वाटप करण्यात आले.मुलींसाठी प्रवास करताना ओढणी वापरल्यास अडचणीचे होत आहे अशी खंत मुख्याध्यापक भटू देवरे यांनी व्यक्त केल्याने परिसरातील पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता कोराई गड शिक्षण संस्था संचालिका व आंबवणे गावाच्या माजी आदर्श सरपंच सौं वत्सलाताई वाळंज यांनी आपल्या जाई वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने सर्व मुलींना जॅकीट व प्रत्येक विद्यार्थ्यास टाय देण्याचं ठरवले. जेष्ठ समजसेवक नंदकुमार वाळंज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून शाळेत येऊन डॉ जयेश शेठ,सुरेश दादा कालेकर,नंदकुमार वाळंज,सौं.वत्सलाताई वाळंज नारायण दळवी,गणेश दळवी पाटील,सुनील हुंडारे,कुंभारताई या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोफत जॅकीट वाटप करण्यात आले.पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.देवरेसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर नंदकुमार वाळंज यांनी आभार मानले.संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.



