*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘दिल की धडकन’ मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर )दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६ व्हॅलेंटाइन डे निमित्त शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘दिल की धडकन’ या प्रणयरम्य हिंदी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीच्या निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहातील सादरीकरणाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राखी झोपे आणि अनिल झोपे या दांपत्याच्या संकल्पना आणि निर्मितीतून साकार झालेल्या या खास सांगीतिक मैफलीत विजय किल्लेदार – भारती किल्लेदार,किरण वैद्य – डॉ. सारिका वैद्य, अनिल झोपे – राखी झोपे या प्रत्यक्षातील पती – पत्नीसह राजेश कुलकर्णी, प्रसिथा बिजुराज, प्रमोद शर्मा, कविता शाह, वेंकट श्रीनिवास, नयना कालकर, सदानंद भोसले, स्वप्निल शेठ, श्रीया दास, आदित्य बीपीएम, स्वाती केसकर, राम मोहन एस, ज्योती तेरवाडकर या गायक कलाकारांनी आपल्या युगुलस्वरातील अप्रतिम अन् अविस्मरणीय गीतांच्या माध्यमातून प्रेम या मानवी भावविश्वातील सर्वोच्च भावनेच्या वैविध्यपूर्ण छटांची सुरेल अनुभूती दिली.इंडियन म्युझिकल क्लब (आय एम सी) प्रस्तुत या ४६ व्या विशेष सांगीतिक मैफलीचा प्रारंभ हृदयाच्या आकारांचे गुलाबी फुगे रंगमंचावर आकर्षकरीत्या मांडून करण्यात आला होता. याशिवाय रंगमंचाच्या पार्श्‍वभागावरील पटलावर संबंधित गीताची चित्रपटातील दृश्ये आणि प्रेमाची प्रतीके प्रदर्शित करण्यात येत होती. ‘हम प्यार करनेवाले…’ , ‘मेरा दिल भी कितना पागल हैं…’ , ‘ए मेरे हमसफर…’ , ‘जानेमन जानेमन…’ , ‘इस प्यार से मेरी तरफ…’ , ‘बादल यू गरजता हैं…’ , ‘तू ही रे…’ , ‘हमको सिर्फ तुमसे प्यार…’ , ‘देखा एक ख्वाब तो…’ , ‘दिल हैं के मानता नही…’ , ‘हो गया हैं तुज को तो प्यार…’ , ‘तुम्ही देखो ना…’ , ‘मुझे नींद न आये…’ , ‘पन्ना की तमन्ना हैं…’ , ‘तू प्यार तू प्रीत…’ , ‘अब तेरे दिल में…’ , ‘मदहोश दिल की धडकन…’ , ‘हुस्न पहाडों का…’ , ‘क्या यही प्यार हैं?…’ , ‘ऐसी दिवानगी…’ , ‘एक दिन आप यू…’ , ‘तू जो मेरे सूर में…’ , ‘बाहों के दरम्यान…’ , ‘गवाह हैं चाँद…’ , ‘आपकी आँखों में…’ , ‘कभी मैं कहू…’ , ‘आजा शाम होने आयी…’ अशा एकाहून एक श्रवणीय गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले असतानाच ‘परदेसीयाँ ये सच हैं पिया…’ या लोकप्रिय गीताने मैफलीचा समारोप करण्यात आला.आय एम सीचे संजय वाघचौरे यांनी ध्वनिसंयोजन व छायाचित्रण केले. विक्रम क्रिएशन्सने दृकश्राव्यचित्रण केले. आय एम सीचे दीपक निस्ताने, धनश्री भोळे आणि प्रशांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन व रंगमंच व्यवस्था चोखपणे बजावली. आदिती खटावकर यांनी मैफलीचे बहारदार निवेदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page