पूना सिक्युरिटी इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे आज तळेगाव दाभाडे एम् आय डीसी येथे आपत्कालीन प्रत्यक्षिक


मावळ मराठा न्यूज़ :-प्रतिनिधि ,तळेगाव ,संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित कंपन्यांमध्ये सिक्युरिटी सेवा पुरवणारी पूना सिक्युरिटी इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे आज तळेगाव दाभाडे एमआयडीसी मध्ये आपातकालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा रक्षक यांनी कसा सामना करावा याचे विविध विषयांवर ट्रेनिंग झाले हे ट्रेनिंग वन्यजीव मावळ संस्था चे सदस्य व आपदा मित्र सर्जेस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या दुर्घटना होतात जसे की आग लागणे एक्सीडेंट होणे विषारी गॅस लिकेज होणे शॉक सर्किट होणे असे अनेक अपघात होतात या अपघाताला कसे सामोरे जायचे व त्यासाठी काय उपाययोजना करायच्या या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले.




