प्रांतपाल लायन विजय भंडारी यांनी लायन्स क्लब तळेगावला सदिच्छा भेट देऊन केले तोंडभरून कौतुक

मावळ मराठा न्युज :-तळेगाव,दिनांक १३ जून २०२४ प्रांतपालांच्या या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने कायम स्वरूपाच्या ऍक्टिव्हिटी बरोबरच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या खालील ऍक्टिव्हिटीज ही करण्यात आल्या.(१) श्री श्री सचिन घोटकुले संचलित अढले बुद्रुकस्थित गुरुकुल आंतरराष्ट्रीय विद्यालयात शुद्ध पेय जल प्रकल्प २) हिंदमाता भुयारी जवळ ऑक्सीजन पार्क प्रकल्प ३) तळेगाव स्टेशन स्थित तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर लायन्स चिल्ड्रन्स पार्क, ४) लायन्स मैत्री कट्टा ५) शुद्ध पेय जल पाणपोई व ६) लायन्स वनराई मध्ये वृक्षारोपण या प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ करण्यात आला. तसेच तलाव परिसरामध्ये जनजागृतीसाठी होर्डिंग्स लावण्यात आले व तलाव जवळ पाण्यात बुडण्यापासून बचावा करिता वॉटर सेफ्टी ट्यूब लावण्यात आल्या .लायन्स हॉलच्या परिसरात स्वर्गीय लायन तानाजी थिटे यांच्या स्मरणार्थ मेडिकल इक्विपमेंट आणि गरजू ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप चा समारंभ संपन्न झाला. वरील सर्व उपक्रम यशस्वी करण्यास खालील लायन सभासदांनी रात्रंदिवस समर्पित भावनेने मनापासून मेहनत घेतली त्यामुळे सर्व कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झालेत. जेष्ठ ला.नंदकुमार काळोखे, ला. दीपकभाई शहा,ला. शैलेश शहा, ला. महेशभाई शहा,ला. दीपक बाळसराफ, ला. रणजीत काकडे,आर्थिक सहाय्य रोटेरियन मनोज ढमाले, ला. सुनील वाळुंज, ला. सौ प्रमिला वाळुंज ला. प्रियांका काळोखे,भरत पोद्दार, ज्येष्ठ ला. डॉक्टर शालिग्राम भंडारी यांच्याबरोबरच ला शेखर चौधरी, कर्तव्यदक्ष सेक्रेटरी ला. सौ सचेत्रा चौधरी, खजिनदार ला. प्रकाश पटेल आणि या सर्वांना सक्रिय मार्गदर्शन करणारे अध्यक्ष ला. डॉ.अनिकेत काळोखे या सर्वांच्या सांघिक परिश्रमाच तोंड भरून कौतुक प्रांतपाल विजय भंडारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि दहावी बारावीच्या परीक्षेतील घवघवीत यश प्राप्त करणाऱ्यां विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर तळेगाव लायन्स क्लबच्या क्रियाशील सभासदांचा यथोचित सत्कार प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page